पुणे — सर्वसामान्य जनतेचे हित जपणे हाच काँग्रेस चा खरा विचार आहे .तोच विचार घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जात आहोत .त्यामुळे
काशेवाडी,लोहियानगर ,डायस प्लॉट या भागाचा परिपूर्ण विकास करणे हाच आमचा ध्यास आहे असे मत माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी व्यक्त केले .
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग 22 मधील अखिल भारतीय काँग्रेस – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफीक शेख व दिलशाद शेख या उमेदवारांनी काशेवाडी भागात पदयात्रेद्वारे आज जनतेशी संवाद साधला त्या पदयात्रेच्या समारोप सभेत बागवे बोलत होते.
पुढे ते म्हणाले की .काशेवाडी,लोहियानगर व डायस प्लॉट हा भाग पूर्णपणे झोपडपट्टीचा आहे .या भागात शिक्षण ,आरोग्य व स्वच्छता या प्रमुख गोष्टी महत्वाच्या आहेत .इथला प्रत्येक व्यक्ती ही माझीच आहे मला कुटुंबासारखी आहे .त्यामुळे या भागाचा विकास हाच आमचा मुख्य ध्यास असणार आहे .म्हणूनच तुम्ही आमच्यावर विश्वास आणि प्रेम ठेवून पाठीशी खंबीर उभे रहाल अशी आशा अविनाश बागवे यांनी व्यक्त केली .
इंदिरा अविनाश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांनीही आपल्या मनोगतातून मतदारांना आवाहन केले .आज कासेवाडी,एसआर ए प्रकल्प व परिसरात पदयात्रेतून उमेदवारांनी नागरिकांशी मुक्तपणे संवाद साधला .आजच्या पदयात्रेला युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत होते .
आज निघालेल्या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, यासेर बागवे,चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख,रोपभाई शेख,आरीफ शेख ,विठ्ठल थोरात,दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे व इतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी व मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
इंदिरा आणि अविनाश बागवे ,रफीक शेख व दिलशाद शेख यांनी साधला आम जनतेशी संवाद
Date:

