पुणे-पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील माऊली गार्डन सोसायटीत अमोल बालवडकर यांनी भेट देऊन येथील रहिवाशांशी सुसंवाद साधला. या भेटीत परिसरातील दैनंदिन नागरी प्रश्नांवर, पाणीपुरवठ्याची नियमितता, अंतर्गत रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली.
या संवादावेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सौ. वैशालीताई कमाजदार त्यांच्या समवेत उपस्थित होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर यांनी बाणेर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमची दृष्टी, प्राधान्यक्रम आणि आगामी कृती आराखडा नागरिकांसमोर स्पष्ट केला. केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याची भूमिका मांडत, येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी पाठबळ द्यावे असे आवाहन केले.
दरम्यान नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करून आमची साथ नेहमी आपल्यासोबत राहील असे आश्वस्त केले. दरम्यान नागरिकांच्या सक्रिय सहकार्याच्या जोरावर माऊली गार्डनसह संपूर्ण बाणेर परिसराचा सुयोग्य, सुरक्षित व नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून काम करत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

