पुणे दि.११: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-लोहगाव) मधील शिवसेना उमेदवार गायत्री पवार आणि हेमंत बत्ते यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
दि. १० जानेवारी रोजीच्या सभेत डॉ. गोऱ्हे यांनी प्रभागातील प्रमुख समस्या सोडवण्या सोबतच, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार, प्रत्येक प्रभागात ‘हिंदुहृदयसम्राट आपला दवाखाना’ सुरू करणार, वाड्यांचा पुनर्विकास करणार, बसमध्ये महिलांसाठी सवलत देणार आणि मेट्रोचे जाळे विस्तारित करणार, असे आश्वासन दिले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. तसेच विविध समाज घटकांसाठी असलेल्या महामंडळांच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे.”
शिवसेनेचे उमेदवार सामान्य कुटुंबातील असून, इतर पक्षांच्या उमेदवारांच्या घरातीलच अनेक जण निवडणुकीत उभे आहेत त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, हीच जनतेच्या विकासाची हमी आहे, असे आवाहन त्यांनी केले.

