शिळीमकर आणि धूत या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल:१२ वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

Date:

पुणे-कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात पतंग उडवताना इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेस जबाबदार धरून बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीतील जिन्याला कठडे नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. इमारतीचे काम अर्धवट असल्याचे आणि जिन्यांना कठडे नसल्याचे उघड झाले. बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, योगेश शिळीमकर आणि महेश धूत या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्लोक नितीन बांदल (वय १२, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. श्लोक पाचवीत शिकत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. श्लोकचे मामा अमोल सुभाष इंगवले (वय ३५, रा. औदुंबर निवास, कात्रज गावठाण) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द परिसरात एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी (८ जानेवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास श्लोक शाळा सुटल्यानंतर पतंग उडवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेला होता. सहाव्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले आणि सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. २८ : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व...

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२६: महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य...

अरण येथे संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका नेण्याच्या मागणीवर सभागृहात चर्चा

वारकरी संप्रदायाच्या भावनांचा सन्मान राखत, समाधी सोहळ्यापूर्वी सर्वसंमतीने निर्णय...

पुण्यात गावठी दारू अड्ड्यावर छापा:महिला अटकेत, ६ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे -नगर रस्त्यावरील भावडी गावात गावठी दारू तयार करणाऱ्या...