पुणे- स्वखर्चातून कचरा गाडी सुरू करून केळेवाडी, हनुमाननगर परिसर कचरामुक्त झाला. महिला व युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण वर्गातून रोजगाराच्या संधी मिळाली. यासह स्वच्छ, सुरक्षित आणि अद्ययावत सोयीसुविधातून परिसराचा विकास झाला.विकासकामाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे आणि कांता खिलारे यांच्या पाठीशी आहोत, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला.
प्रभाग ११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर येथील केळेवाडी, हनुमाननगर आणि जयभवानीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती नीलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या प्रचारार्थ माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या उपस्थितीत कोपरा सभा पार पडल्या.
या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मानकर कुटुंबीयांनी केलेल्या कामाचे कौतुक करत, जिथे भाऊ तिथे विकास, असे सांगत सोबत राहण्याचे अश्वासन दिले. या वेळी अमरज्योत मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, दुर्गामाता प्रतिष्ठान, राजमुद्रा प्रतिष्ठान, हनुमाननगर येथील मिलिंद संघ, तसेच जयभवानीनगर परिसरात महिलांनी उमेदवारांचे फटाके वाजवून, पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
हर्षवर्धन पाणी, वीज, कचरा व्यवस्थापनासह मूलभूत गरजांची कामे करीत आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शाळांचा विकास करत असल्याचे दीपक मानकर यांनी सांगितले. मोठ्या भावाप्रमाणे दीपकभाऊ मदतीला धावून आले, त्यामुळे माझ्या मुलीला पुर्नजन्म मिळाल्याची भावना एका महिलेने व्यक्त केली.

