चंद्रकांतदादा पाटील यांचा गाडीच्या टपावर उभारून प्रचार

Date:

पुणे;

भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ताशांच्या गजरात, ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, भाजपच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही या पदयात्रेत सहभागी होत, गाडीच्या टपावर उभारून नागरिकांना संबोधित केले.

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, मनीषा बुटाला, शर्मिला शिंदे यांच्या प्रचारार्थ आज कोथरुड मधील पौड फाटा देवी मंदिर, केळेवाडी हनुमाननगर भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पौड फाटा येथील दुर्गामाता मंदिर येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. पौडफाटा दुर्गामाता मंदिर, केळेवाडी, हनुमान नगर, मोरे विद्यालय, रामबाग कॅालनी, शिवतीर्थ नगर, जयभवानी नगर, म्हातोबादरा आणि सुतारदरा दरम्यान रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये महिलांचा आणि तरुणांचा सहभाग अतिशय मोठा होता.

ना. चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले की, कोथरुडकरांनी दोनवेळा मला निवडून दिले. गेल्या सहा वर्षात कोथरुड मधील नागरिकांच्या गरजा ओळखून अनेक विकासकामांसह लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. मानसी, सुखदा सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील माझ्या लेकींसाठी काम करण्याची संधी मिळाली. विरोधकांनाही हे उपक्रम केवळ निवडणुकीसाठीच आहेत, असा अपप्रचार करत होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर अजूनही हे उपक्रम सुरुच आहेत; भविष्यात ही सुरुच राहितील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

प्रभाग क्रमांक ११ मधील रॅलीला आणि समारोप सभेला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहून ही विजयी सभा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, विकासाची ही गती कायम राखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत जसे मला विजयी केले; त्याचप्रमाणे पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. तसेच, कोणत्याही दमदाटीला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

दरम्यान, या पदयात्रेत ठिकठिकाणी महिलांनी ना. चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचे औक्षण करुन विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या रॅलीचा मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधकांमध्ये धडकी भरल्याची चर्चा सध्या प्रभागात रंगली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...

अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे,इराणचे सैन्य आता आमच्या नियंत्रणाखाली..ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला संबोधित करत आहेत....

खाजगी विमा कंपन्यांकडून दावे फेटाळण्याचे प्रमाण अन्यायकारक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत लक्षवेधी; नियमन...