संजय राऊतांची पुण्यात धडाडली तोफ,भाजपसह राष्ट्रवादीच्या कारभाराचा केला पंचनामा

Date:

पुणे, दि . १० (प्रतिनिधी) – पुण्याची ओळख एकेकाळी शिक्षणाचे, संस्कृतीचे शहर अशी होती. मात्र आज ते गुंडांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कुठून कोयता गँग येईल, याचा नेम नाही. त्यामुळे रस्त्यावर यायलाही भीती वाटू लागली आहे. सत्ताधार्‍यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीटे दिली आहेत. गुंडगिरी, दादागिरीशिवाय सत्ताधारी पक्ष निवडणूका जिंकूच शकत नाही असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केली. पुण्यातील जनता सुजाण असून मतदानातून ही गुंडगिरी गाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत भ्रष्ट सत्ताधार्‍यांना दूर ठेवण्यासाठी मशाल पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.

बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज प्रभाग क्रमांक ३८ आणि कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी प्रभाग ४० मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, पंकज जगताप, स्नेहल कामठे, रुपेश मोरे, कल्पना थोरवे, प्रशांत बधे, गणेश कामठे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, अस्मिता रानभरे, सुभाष घुले, संजय कामठे, अनिल परदेशी, मंगेश रासकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. आज पुण्यात गुंड टोळ्यांची दहशत वाढली आहे. पूर्वी पुण्यात लोक आनंदाने यायचे, आज मात्र पुण्यात येण्याची भीती वाटते. पुण्यातल्या कोयत्याला राष्ट्रीय हत्यार म्हणून मान्यता दिली पाहिजे. ही परिस्थिती सत्ताधार्‍यांच्या अपयशामुळे निर्माण झाली आहे. गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याऐवजी ‘गुंडांना, त्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीची तिकिटे दिली आहेत. ‘दाऊद किंवा छोटा शकील भेटला असता तरी त्यांनाही तिकीट दिले असते. मात्र, अशा गुंडगिरी प्रवृत्तीशी लढण्याची शिवसेनेची जूनी परंपरा आहे. मुडदे पाडणारे, खंडणी मागणार्‍यांना शिवसेनेने तिकीटे दिली नाहीत. तर, सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार्‍यांना तिकीटे दिली, असे त्यांनी सांगितले.
सत्ताधारी भाजपला सत्तेचा माज आला असून लोकसभा ते ग्रामपंचायतीपर्यंत त्यांनी आपली सत्ता हवी आहे. विरोधकांना एकही जागा मिळू न देण्याची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मात्र, लोकशाही आणि महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल करीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र डागले. दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूतील भाजपचा नेता अण्णामलाई हा मुंबईत येऊन ‘मुंबई महाराष्ट्राची नाही, असे म्हणून गेला. तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे हे गप्प बसले. अशाप्रकारे बोलणार्‍यांवर सरकार गप्प का आहे? असा सवाल करीत शिवसेना ही मराठी माणसासाठी उभी राहिली आणि राहील, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. ‘आम्ही पुण्यात चांगला आकडा गाठू. कदाचित आमच्याशिवाय तुम्हाला सत्ता बनविता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर भाजप शिंदेंना लाथ मारून हाकलेल

‘शिंदेंची शिवसेना ही अमित शहा यांची कंपनी आहे. कायद्याने शिवसेना नाव आणि चिन्ह आम्हालाच द्यावे लागणार असल्याने तारीख पे तारीख सुरू आहे. एकदा का चिन्ह मिळाले की भाजप शिंदेंना लाथ मारून हाकलून देईल, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
शिवसेना संपविणार्‍यांना धडा शिकवा
भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी हिंदूह्दयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राला पुण्य अर्पण केले आहे. आजही मला, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की शिवसेनाप्रमुखांचे आपल्यावर लक्ष आहे. ६० वर्ष शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यांची शिवसेना संपविण्यासाठी आज प्रयत्न केले जात आहेत. त्यांना धडा शिकविण्यासाठी आपण एका जिद्दीने अणि तितक्याच प्रेमाने मशालीला विजय करा. ज्या दिवशी महाराष्ट्रातून ही मशाल विझेल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसांच्या जीवनात अंध्ाकार होईल. ते होवू नये, यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एकजूटीने उभे राहा आणि या भ्रष्ट्र शासनकर्त्यांना परत सत्ता मिळू देवू नका, ही मशाल अशीच पेटत राहूद्या. याच्यामध्ये शिवसेनाप्रमुखांचा आत्मा आहे, असे ते म्हणाले.


भाजपाच्या फेकनामा’चे प्रकाशन

भाजपने गेल्या महापालिका निवडणूकीत पुणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला. मात्र, ती आश्वासने, घोषणा हवेत विरल्या. भाजपने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणार्‍या ‘फेकनामा भाजपचा’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, ‘फेकनामा’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालया हवा. फेकाफेकी करून सत्तेत येणार्‍या मोदी–फडणवीस यांना ‘फेकाफेकी’साठी नोबेल पुरस्कार द्यावा, असा खोचक टोला त्यांनी लगावला.


३० वर्षांपासून सत्तेत, तुम्हाला पुण्याला पाणी देता आले नाही?

‘गेल्या ३० वर्षांपासून तुम्ही, तुमचं कुटुंब सत्तेत आहात. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री अशी पदे भूषवली. तरीही पुण्याला पाणी देता आले नाही, रस्ते नीट करता आले नाहीत, गुंडगिरी संपवता आली नाही. आता पुण्याच्या वाहतूक कोंडीच्या समस्येंसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन अजित पवार देतात. मात्र, ही वेळ दिल्लीत जाऊन चर्चा करायची आहे का? ३० वर्षे सत्तेत असताना तुम्ही काय उपद्व्याप केले? असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याने मोठी क्रांती घडणार असा खोचक टोलाही त्यांनी लगाविला.


औरंगजेबाच्या पिलावळीचा महाराष्ट्र तोडण्याचा प्ऱयत्न

आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दाढीचे भक्त आहोत. मात्र, समोरचे औरंगजेब आणि अफजलखानाच्या दाढीवाले आहेत. या महाराष्ट्रामध्ये, या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांचा जन्म झाला. पण औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्माला आला. ही औरंगजेबाची पिलावळ महाराष्ट्र तोडण्याचे काम वâरीत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.


मुंबई तोडण्यापेक्षा नवीन मुंबई निर्माण करा
महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार गुजरातला पळविले जात आहे. मुंबई देशाची अर्थिक राजधानी आहे. म्हणून त्याला आंतराष्ट्रीय महत्व आहे. पण मुंबईवर सर्वात पहीला हक्क मराठी माणासाचा आहे. मुंबई तोडण्यापेक्षा मुंबईसारखी शहरे बिहार, गुजरातमध्ये तुम्ही निर्माण करा, असा सल्ला त्यांनी सत्ताधार्‍यांना दिला. नाशिक येथे होणार्‍या कुंभमेळ्यासाठी तब्बल ५० हजार कोटींचे टेंडर काढले आहे. यातील सर्व ठेकेदार गुजराती लोक आहेत. मग महाराष्ट्रातील लोकांनी काय करायचे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादा पाटील यांचा गाडीच्या टपावर उभारून प्रचार

पुणे; भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पदयात्रेला अभूतपूर्व...

लोहियानगर एसआरए प्रकल्पातील प्रश्न व अडचणी मार्गी लावणार—रमेश बागवे

पुणे — गेल्या आठ वर्षापासून महापालिका भाजपाच्या ताब्यात...

अजित पवार यांनी केलेली मोफत प्रवासाची घोषणा फसवी:मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पीएमपीएमएल आणि...