पुणे — गेल्या आठ वर्षापासून महापालिका भाजपाच्या ताब्यात आहे .लोहियानगर मधील एसआरए प्रकल्प फसला आहे .लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .त्यातील अस्वच्छता ,हा प्रकल्प नाही तर लोकांची फसवणूक झाली आहे .हा सर्व भकासपना घालवायचा असेल तर या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले .पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग 22 मधील अखिल भारतीय काँग्रेस – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफीक शेख व दिलशाद शेख या उमेदवारांनी आज पदयात्रेच्या समारोप सभेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले की .लोहियानगर हा भाग पूर्णपणे झोपडपट्टीचा आहे .येथील नागरिकांना विविध अडचणी व समस्यांना रोज सामोरे जावे लागते .म्हणून या प्रभागात आता काँग्रेस पक्षाला संधी देण्याचे आवाहन बागवे यांनी यावेळी केले .
लोहियानगर या भागात सर्व जाती धर्माचे लोक असणारी वस्ती आहे .त्यामुळे या भागात सर्व धर्म समभाव या भावनेने काम करावे लागेल .त्यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपण निवडून द्यावे अशी विनंती उमेदवार व माजी नगरसेवक अविनाश बागवे केली .
आज संपूर्ण लोहियानगर वसाहतीत पदयात्रेवारे उमेदवारांनी नागरिकांशी मुक्तपणे संवाद साधला .नागरिकांनी व महिलांनी आजच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत होते .
आज निघालेल्या पदयात्रेत माजी मंत्री रमेश बागवे,जुबेरबाबू शेख, यासेर बागवे,चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख,रोपभाई शेख,आरीफ शेख ,विठ्ठल थोरात,दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे ,राजू बरगुडे इतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
लोहियानगर एसआरए प्रकल्पातील प्रश्न व अडचणी मार्गी लावणार—रमेश बागवे
Date:

