मीनाताई ठाकरे वसाहत – मार्केट यार्ड परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची रॅली

Date:

पुणे-प्रभाग क्रमांक 21 मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क प्रभागातील औद्योगिक वसाहत,मीनाताई ठाकरे वसाहत, वाहन डेपो परिसर ,खड्डा परिसर,पटेल गल्ली,बिलाल मज्जिद परिसर, एकता मित्र मंडळ,दिग्विजय मित्र मंडळ,हनुमान मित्र मंडळ परिसर,क्रांती चौक,समाज मंदिर,डॉ वाडेकर गल्ली परिसरात भारतीय जनता पक्षाच्या रॅलीला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर,मनिषा प्रविण चोरबेले यांच्या प्रचारार्थ या भागात भव्य पदयात्रा देखील संपन्न झाली.

प्रामुख्याने सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांची वस्ती असलेल्या या भागात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक लोककल्याणकारी कामे झाली आहेत.सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा या भागात अतिशय नियोजनबद्ध पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचविण्यात प्रभागातील प्रत्येक उमेदवार यशस्वी ठरल्याने या भागात भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे.

प्रभाग क्रमांक २१ – मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क प्रभागातील भारतीय जनता पार्टी, आर. पी.आय.(आठवले गट) व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना “कमळ” या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले यांनी केले आहे.

यावेळी माजी नगरसेविका वंदनाताई भिमाले,कविताताई वैरागे,प्रवीण चोरबोले, राजश्रीताई शिळीमकर, पुणेशहर युवमोर्चा सरचिटणीस अभिषेक भिमाले,गणेश शेरला, निखिल शिळीमकर,राहुल गुंड,बाळासाहेब शेलार आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे,इराणचे सैन्य आता आमच्या नियंत्रणाखाली..ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला संबोधित करत आहेत....

खाजगी विमा कंपन्यांकडून दावे फेटाळण्याचे प्रमाण अन्यायकारक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत लक्षवेधी; नियमन...

१३० जणांनी प्रत्येकी १.४० कोटी भरले पण बिल्डर घर देईना .. बिल्डर विरोधात प्राणत्याग आंदोलनाचा इशारा

पुणे-खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर.

संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार यांची नियुक्ती मुंबई, दि. १ एप्रिल...