पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा खासदार सुनेत्रा पवारांच्या हाती, उमेदवारांना दिले संघटनात्मक धडे

Date:

पुणे, ९ जानेवारी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यभर दौरे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे महानगरपालिका निवडणूक मोहिमेची धुरा आता खासदार सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली आहे. त्यांनी आज जिजाऊ बंगला निवासस्थानी पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या.

पक्षाच्या संघटनात्मक तयारीपासून ते प्रभाग निहाय प्रचारातील बारकाव्यांवर चर्चा करताना सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक उमेदवाराशी स्वतंत्र साधला. मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर, स्थानिक प्रश्नांवर संवेदनशीलपणे भाष्य करण्यावर आणि विकासकामांचे भक्कम उदाहरण जनतेसमोर ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांनी गेल्या काही दशकांत केलेल्या विकासकामांचा ठोस उल्लेख उमेदवारांनी आपल्या प्रचारातून करावा, असे स्पष्ट मार्गदर्शन त्यांनी दिले. संघटना तळागाळात अधिक मजबूत करण्याची आणि सर्व स्तरांवर समन्वय राखण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत प्रत्येक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील निवडणूक परिस्थिती, बूथवार कार्यकर्त्यांची तयारी तसेच प्रचार योजनांचा आढावा दिला. सर्व उमेदवारांनी सामूहिकपणे एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय हा प्रत्येक कार्यकर्त्याचा संकल्प असल्याचे सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळत असलेले मार्गदर्शन आणि पाठबळ यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक मोहीम आता आणखी वेग घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिले वहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने...

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...