नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करणार — अविनाश बागवे
पुणे — पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग 22 मधील अखिल भारतीय काँग्रेस – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफीक शेख व दिलशाद शेख या उमेदवारांनी आज पदयात्रेची सुरुवात पुना कॉलेज चुडामन तालीम पासून करण्यात आली .पुढे मदीना हॉटेल ,फकीर महामंद चाळ,एस आर ए बिल्डिंग,उर्दू अध्यापक विद्यालय परिसर तसेच सांयकाळी रामोशी गेट ते भवानी पेठ ,बनकर वाडा ,बालाजी मंदिर ते गुरुकृपा सोसायटी व सांयकाळी मोटार स्टँड येथे समारोप करण्यात आला .
आपण सत्तेत आल्यानंतर स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन आपल्या प्रभागातच जनता दरबार आयोजित करणार असल्याचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज जाहीर केले .त्यांच्या या घोषणेला उपस्थित नागरिकांनी प्रतिसाद दिला . आज अतिशय उत्साहात उमेदवारांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले .या पदयात्रेत स्थानिक महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
आज निघालेल्या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख,रोपभाई शेख,आरीफ शेख ,विठ्ठल थोरात,दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे इतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रभाग 22 काशेवाडी- डायस प्लॉट भागातील काँग्रेस उमेदवारांनी पदयात्रेद्वारे साधला नागरिकांशी संवाद
Date:

