आता इतिहास घडवा:एकनाथ शिंदे

Date:

‘सहकारनगर – पद्मावती’मध्ये भगवेमय वातावरण: मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे-
ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी त्यांना चिंता नाही.विधानसभा निवडणुकीत हे आपण पाहिले आहे .आता महापालिका निवडणुकीत पुन्हा दाखवून द्या, इतिहास कसा घडतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर – पद्मावतीमधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रॅलीतून नागरिकांना अभिवादन करून मतदारांशी संवाद साधला.

‘सहकारनगर – पद्मावती’मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे यावेळी ‘लाडक्या बहिणी राहणार एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या पाठीशी ‘ या महिलांच्या घोषणा लक्षवेधी ठरल्या आणि उपस्थितांसह खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दाद दिली.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की,
प्रभाग ३६ मध्ये विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आबा बागुल यांनी नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि पुनर्विकास आदी सर्व कामां साठी आबा बागुल यांना नगरविकास विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली, मात्र त्यासाठी आबांना सातव्यांदा महापालिकेत पाठवून इतिहास घडविण्याची आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी सोडू नका असे आवाहनही शिंदे यांनी मतदारांना केले.

तत्पूर्वी क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकातील सभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती आणि युवकांचा सहभाग पाहता आता परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट केले. आबा बागुल यांचा प्रभाग पाहायला लोकं बाहेरून येतात,त्यामुळे पुण्यातील प्रत्येक प्रभाग आबा बागुल यांच्या प्रभागासारखे झालेच पाहिजे. पुण्याचे वाहतूक, पाणी, आरोग्य असे कोणतेही प्रश्न असो शिवसेना सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी आबा बागुल हे सज्ज आहेत. झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे देण्याबाबत नगरविकास खाते असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच दिलासा देतील. ५०० चौ. फूट घरांचा मिळकतकर माफ करण्याची घोषणाही उदय सामंत यांनी केली. तसेच उद्योगभवन पुण्यात उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.आबा बागुल यांची ताकद आणखी वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारच असेही ते म्हणाले.
आबा बागुल म्हणाले, येत्या १५ तारखेला मतदान करताना फक्त धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबायचे आहे. शिवसेना म्हणजे सर्वांगीण विकास हेच लक्षात ठेवायचे आहे.

निश्चिंत रहा…सर्व मागण्या मार्गी लावणार

यावेळी आबा बागुल यांनी विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या प्रभागातील जागांवर विविध प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन सादर केले.त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले,नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी तातडीची गरज म्हणून तळजाई टेकडी येथे ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीस मान्यता दिली जाईल.

दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा वाढविण्यासाठी तळजाई टेकडी येथे राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा उभारणीला प्राधान्य दिले जाईल.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण सुलभ व्हावे यासाठी वाळवेकर नगर येथे अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज (मोफत / सवलतीत शिक्षण) सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
प्रभाग व शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांना
स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे मिळण्यास परवानगी व शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून
तेथील रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा देण्याबाबत कार्यवाही होईल असे आश्वासन देताना ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या नगरविकास विभागामार्फत निश्चित मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर (रिंग रोड) प्रकल्पाला तातडीने गती देण्याबाबतही निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा - भाऊसाहेब...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ;...