पुणे- एकेकाळी भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांच्या राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभी त्यांना मोठे सहाय्य केलेल्या आणि नंतर कॉंग्रेस मध्ये येऊन सुरेश कलमाडी यांच्या कट्टर समर्थक राहिलेल्या पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेस मधील लढाऊ आणि आक्रमक म्हणू त्यांच्या कडे पाहिले जात . सध्या राष्ट्रवादीत असलेल्या रुपाली पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबध आहेत .पाटलांनी त्यांची कॉंग्रेस मध्ये होणारी घुसमट पाहिली आणि त्यांना आपल्या पक्षाचे निमंत्रण दिले . सुनील खाटपे यावेळी त्यांच्या समवेत होते
शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत
Date:

