स्वयंपाकघरांची गोदरेज ‘इंटेरिओ’ रचना

Date:

भारतीय घरांमध्ये मॉड्यूलर सोल्यूशन्सचा स्वीकार वाढत असल्यानेआर्थिक वर्ष 2030 पर्यंत मॉड्यूलर किचन विभागात 10% सीएजीआरचे कंपनीचे लक्ष्य ~

मुंबई,  07 जानेवारी 2025 : गोदरेज एंटरप्राइझ ग्रुपचा होम आणि ऑफिस फर्निचर ब्रँड असलेल्या इंटेरिओ बाय गोदरेजने पुढील पाच वर्षांत आपला किचन व्यवसाय 10% सीएजीआरने (CAGR) वाढवण्याची योजना जाहीर केली आहे. आधुनिक भारतीय घरांमध्ये स्वयंपाकघरांसाठी असलेल्या जागेसाठी ग्राहकांच्या विविध मागण्यांमुळेया ब्रँडने टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये जोरदार वाढ अनुभवली आहे.

भारतातील किचन आणि डायनिंग फर्निचर मार्केट 2025 मध्ये 251.32 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहेतर 2030 पर्यंत ती 2.28% सीएजीआर दराने वाढेल. नवीन उत्पादनांचे लाँच120 शहरांमधील 250 ठिकाणी किचन गॅलरींचे वाढते प्रमाणआणि महाराष्ट्रातील खालापूर येथील दररोज 250 पर्यंत किचन ऍक्सेसरीजचे उत्पादन करणाऱ्या प्रगत उत्पादन सुविधेमुळे इंटेरिओ या वाढीला मागे टाकण्यासाठी सज्ज आहे.

गोदरेजच्या इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुखदेव नारायण सरकार म्हणाले, “भारतीय स्वयंपाकघर म्हणजे आता केवळ एक उपयुक्त जागा राहिलेली नाहीतर ते जीवनशैलीचे एक प्रतीक बनते आहे. आजच्या ग्राहकांना असे मॉड्यूलर उपाय हवे आहेतजे डिझाइनकार्यक्षमता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांचा मेळ घालतील. या बदलत्या आकांक्षांमुळेच आम्ही वेगाने प्रगती करत आहोत. आणि आता आमच्या विक्रीपैकी 35% विक्री टियर 2-3 शहरांमधून होत आहेजी आर्थिक वर्ष 24 मध्ये 24% होती.”

इंटेरिओने आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किचन कॉन्फिगरेटर‘ लाँच केले आहेज्यामुळे ग्राहक 3D मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या स्वप्नातील स्वयंपाकघरची कल्पना करू शकतात. स्वयंपाकघरांच्या मूलभूत मांडणीसाठी डिझाइन केलेले पूर्वनिर्धारित मॉड्यूल्स या प्लॅटफॉर्मवर बघता येतात. याची किंमत 1.25 लाख रुपयांपासून सुरू होते. ग्राहक कॉन्फिगरेटरद्वारे थेट जवळच्या डीलरशी संपर्क साधून विशिष्ट जागा आणि बांधकामविषयक आवश्यकतांच्या अनुषंगाने स्वतःच्या आवडी-निवडी सांगू शकतात.

इंटिरिओच्या किचन विभागातील प्रमुख उत्पादनांपैकी एक म्हणजे ‘स्टील शेफ’, जे मध्यम प्रीमियम विभागासाठी मॉड्यूलर स्टील किचनची श्रेणी प्रदान करते, ज्यात टिकाऊपणा, सौंदर्यशास्त्र आणि वैयक्तिक पसंतीचे पर्याय यांचे उत्तम एकत्रीकरण आहे. भारतीय स्वयंपाकघरातील नेहमीच्या अडचणींवर मात करण्यासाठी इंटिरिओ स्मार्ट चिमनी, टॉल कॉर्नर युनिट, 2200 युनिट्स, टॉल पुल-आउट युनिट्स (7 फूट) यांसारख्या महत्त्वाच्या ॲक्सेसरीजचे उत्पादन देखील करते.

अनुकूलता आणि जागेचा कार्यक्षम वापर यामुळे, एल-आकाराचा किचन लेआउट भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. इंटरिओचे मॉड्यूलर सीकेडी (कम्प्लीटली नॉक्ड डाउन) युनिट्स आधुनिक सेवा उपकरणांसह वेगाने कार्यान्वित करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. पूर्वीच्या पद्धतीनुसार, सुताराने बनवलेल्या स्वयंपाकघरांमध्ये, सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागण्यासाठी सरासरी 5-7 दिवस लागत. वेगाने विकसित होत असलेल्या मार्केटमध्ये स्वतःचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी इंटरिओ स्मार्ट होम इंटिग्रेशन, टिकाऊ साहित्य, बायोफिलिक डिझाइन घटक आणि बहुउद्देशीय फर्निचर यांसारख्या उदयोन्मुख ट्रेंडचा फायदा घेण्याची योजना आखते आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ग्रो म्युच्युअल फंडने सादर केला ‘ग्रो स्मॉल कॅप फंड’

ग्रो म्युच्युअल फंडच्या QGaRP (वाजवी किमतीत गुणवत्ता आणि वाढ)...

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडने ‘महिंद्रा मॅन्युलाइफ इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज फंड’ लाँच केला

·         नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. नवीन फंड ऑफर...

अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री मंगळवार 13 जानेवारी 2026 पासून  होणार सुरु

• अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) च्या 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित • प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – सोमवार 12 जानेवारी 2026 • बोली / ऑफर सुरू होण्याचा दिनांक – मंगळवार, 13 जानेवारी 2026 आणि बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक – शुक्रवार, 16 जानेवारी 2026 • 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल 8 जानेवारी 2026: अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी प्रती इक्विटी शेअर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या इक्विटी समभागांची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस हा बोली / ऑफर सुरू होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी, म्हणजे सोमवार, 12 जानेवारी 2026 आहे. बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 16 जानेवारी 2026 आहे. ऑफरसाठी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल प्राथमिक समभाग विक्रीमध्ये एकूण 8,160.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू  तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री समभागभागधारकांकडून 26,942,343 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. ऑफर फॉर सेल मध्ये पीआय ऑपर्च्युनिटीज फंड I कडून 9,889,646 पर्यंतचे इक्विटी शेअर्स,  अ‍ॅक्सेल इंडिया VI (मॉरिशस) लिमिटेड  कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ट्रुडी होल्डिंग्स कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पीआय ऑपर्च्युनिटीज फंड II कडून 3,411,792 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, नॉरवेस्ट व्हेंचर पार्टनर्स X...