ग्रो म्युच्युअल फंडने सादर केला ‘ग्रो स्मॉल कॅप फंड’

Date:

ग्रो म्युच्युअल फंडच्या QGaRP (वाजवी किमतीत गुणवत्ता आणि वाढ) चौकटीच्या मार्गदर्शनाखाली, शिस्तबद्ध बॉटम-अप शेअर निवडीवर आधारित तयार करण्यात आलेला ट्रू-टू-लेबल स्मॉल कॅप फंड

बेंगळुरू, 7 जानेवारी 2026 : ग्रो म्युच्युअल फंडने ग्रो स्मॉल कॅप फंडच्या लाँचची घोषणा केली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून, प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे. या फंडाचा न्यू फंड ऑफर (एनएफओ) 8 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत खुला राहणार आहे. शिस्तबद्ध बॉटम-अप गुंतवणूक पद्धतीचा अवलंब करत, ग्रो म्युच्युअल फंडच्या QGaRP चौकटीवर — वाजवी किमतीत गुणवत्ता आणि वाढ (क्वालिटी अँड ग्रोथ अ‍ॅट अ रिझनेबल प्राइस) आधारित धोरणानुसार, उच्च दर्जाच्या आणि विस्तारक्षम स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

भारताची अर्थव्यवस्था सध्या सर्वांगीण परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. भौतिक पायाभूत सुविधा, वित्तीय व्यवस्था आणि तांत्रिक क्षमतांमध्ये होत असलेली लक्षणीय सुधारणा सर्व आकारांच्या उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण करत आहे. पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च, अधिक सखोल होत जाणारे भांडवली बाजार, औपचारिक कर्जसुविधांपर्यंत सुधारलेली पोहोच आणि देशव्यापी डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांमुळे लहान कंपन्यांना भेडसावणारे पारंपरिक तोटे हळूहळू कमी होत आहेत. परिणामी, आज अनेक लघुउद्योग आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि अधिक प्रभावीपणे स्पर्धा करण्यासाठी सक्षम स्थितीत आहेत.

इतिहास पाहता, स्मॉल कॅप शेअर्समध्ये दीर्घकालीन काळात लार्ज कॅप शेअर्सच्या तुलनेत अधिक परतावा देण्याची क्षमता दिसून आली आहे. तुलनेने लहान आधार आणि वाढीसाठी उपलब्ध असलेली मोठी संधी (हेडरूम) हे स्मॉल कॅप गुंतवणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.भूतकाळातील कामगिरी भविष्यात कायम राहीलच असे नाही आणि ती भविष्यातील परताव्याची कोणतीही हमी देत नाही. वरील कामगिरी कोणत्याही विशिष्ट म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.

स्मॉल कॅप शेअर्समधून गुंतवणूकदारांना विविध आणि व्यापक अशा निश, विशेषीकृत आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहभागाची संधी मिळते, जी इतर सेगमेंटमध्ये तुलनेने कमी प्रमाणात किंवा मुळीच उपलब्ध नसते. या क्षेत्रांमध्ये रचनात्मक (स्ट्रक्चरल) बदलांचा फायदा घेणारे उद्योगही येतात, तसेच ज्या ठिकाणी केवळ व्यापक आर्थिक चक्रांपेक्षा कंपन्यांच्या स्वतःच्या अंमलबजावणी क्षमतेवरच वाढ अधिक अवलंबून असते, अशा क्षेत्रांचाही समावेश असतो.

या विविधतेनंतरही स्मॉल कॅप विश्वातील मोठ्या भागावर अजूनही विश्लेषकांचे तुलनेने कमी लक्ष आहे. परिणामी माहितीतील तफावत निर्माण होते. हीच तफावत शिस्तबद्ध, संशोधनाधारित गुंतवणूकदारांसाठी वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील दर्जेदार कंपन्या ओळखण्याच्या संधी निर्माण करते.

Note : Large Cap Companies shall be 1st -100th company in terms of full market capitalization;

• Mid Cap Companies shall be 101st -250th company in terms of full market capitalization; and

• Small Cap Companies shall be 251st company onwards in terms of full market capitalization as per the list prepared by AMFI

अखेर, तुलनेने कमी कामगिरीच्या एका वर्षानंतर स्मॉल कॅप विभागातील काही भागांमध्ये मूल्यांकनात (व्हॅल्युएशन्स) मवाळपणा दिसून येत आहे, तर दुसरीकडे अनेक कंपन्यांचे मूलभूत घटक सातत्याने मजबूत होत राहिले आहेत. सुधारत जाणारी मूलभूत स्थिती आणि अधिक वाजवी मूल्यांकन यांचा हा संगम बॉटम-अप शेअर निवडीसाठी उपलब्ध संधींचा विस्तार करत आहे.

Source : NSE, data as on Dec 31, 2025

PE – Price to earnings ratio.

^Q2FY25 आणि Q2FY26 च्या आकडेवारीवर आधारित. | *१ वर्षांचा परतावा २५ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या स्थितीनुसार. | गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.

भूतकाळातील कामगिरी भविष्यात कायम राहीलच असे नाही आणि ती भविष्यातील परताव्याची कोणतीही हमी देत नाही. वरील कामगिरी कोणत्याही विशिष्ट म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.

ग्रो स्मॉल कॅप फंड हा ट्रू-टू-लेबल आदेशानुसार चालवला जाणारा फंड असून, प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्समध्येच गुंतवणूक करतो आणि यात लार्ज कॅप शेअर्सचा कोणताही समावेश नाही. ही योजना पूर्णतः बॉटम-अप पद्धतीवर आधारित असून, व्यापक आर्थिक घटकांवर किंवा थीमॅटिक अंदाजांवर अवलंबून न राहता, मजबूत मूलभूत घटक, शाश्वत वाढीची क्षमता आणि वाजवी मूल्यांकन असलेल्या व्यवसायांची ओळख पटवण्यावर भर देते.

या गुंतवणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ग्रो म्युच्युअल फंडची QGaRP चौकट आहे. या चौकटीत प्रत्येक गुंतवणुकीचे मूल्यांकन तीन प्रमुख निकषांवर केले जाते — व्यवसाय आणि व्यवस्थापनाची गुणवत्ता, वाढीची क्षमता, तसेच मूल्यांकनातील शिस्त.

ग्रो स्मॉल कॅप फंड हा शिस्तबद्ध आणि ट्रू-टू-लेबल स्मॉल कॅप धोरणाद्वारे दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी विचारात घेण्यासारखा पर्याय ठरू शकतो. अनेक वर्षांचा गुंतवणूक कालावधी ठेवण्याची तयारी असलेले, मधल्या काळात येणाऱ्या तुलनेने जास्त चढउतारांना सामोरे जाण्याची क्षमता असलेले आणि आपल्या विद्यमान लार्ज व मिड कॅप गुंतवणुकीला भारतातील स्मॉल कॅप विश्वातील निवडक सहभागाने पूरक ठरवू इच्छिणारे गुंतवणूकदार या फंडासाठी योग्य ठरू शकतात.

योजनेचे तपशील

●     योजनेचा प्रकार : स्मॉल कॅप शेअर्समध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी ओपन-एंडेड इक्विटी योजना

●     बेंचमार्क : निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांक – टीआरआय

●     एनएफओ कालावधी : ८ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६

●     फंड मॅनेजर : अनुपम तिवारी

●     किमान गुंतवणूक : ₹५०० आणि त्यानंतर ₹१ च्या पटीत

●     एग्झिट लोड : वाटपाच्या तारखेपासून १ वर्षाच्या आत रिडीम केल्यास १%; त्यानंतर शून्य

गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी योजनेचा माहिती दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावा, असा सल्ला देण्यात येतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वयंपाकघरांची गोदरेज ‘इंटेरिओ’ रचना

भारतीय घरांमध्ये मॉड्यूलर सोल्यूशन्सचा स्वीकार वाढत असल्याने, आर्थिक वर्ष 2030 पर्यंत मॉड्यूलर...

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडने ‘महिंद्रा मॅन्युलाइफ इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज फंड’ लाँच केला

·         नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. नवीन फंड ऑफर...

अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री मंगळवार 13 जानेवारी 2026 पासून  होणार सुरु

• अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) च्या 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित • प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – सोमवार 12 जानेवारी 2026 • बोली / ऑफर सुरू होण्याचा दिनांक – मंगळवार, 13 जानेवारी 2026 आणि बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक – शुक्रवार, 16 जानेवारी 2026 • 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल 8 जानेवारी 2026: अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी प्रती इक्विटी शेअर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या इक्विटी समभागांची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस हा बोली / ऑफर सुरू होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी, म्हणजे सोमवार, 12 जानेवारी 2026 आहे. बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 16 जानेवारी 2026 आहे. ऑफरसाठी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल प्राथमिक समभाग विक्रीमध्ये एकूण 8,160.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू  तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री समभागभागधारकांकडून 26,942,343 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. ऑफर फॉर सेल मध्ये पीआय ऑपर्च्युनिटीज फंड I कडून 9,889,646 पर्यंतचे इक्विटी शेअर्स,  अ‍ॅक्सेल इंडिया VI (मॉरिशस) लिमिटेड  कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ट्रुडी होल्डिंग्स कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पीआय ऑपर्च्युनिटीज फंड II कडून 3,411,792 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, नॉरवेस्ट व्हेंचर पार्टनर्स X...

दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!

म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून चंद्रकांतदादांचे आभार पुणे- दादा… तुम्ही गरीब मुलींची...