· नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. नवीन फंड ऑफर (NFO) 09 जानेवारी, 2026 रोजी सुरू होईल आणि 23 जानेवारी, 2026 रोजी बंद होईल, तसेच 02 फेब्रुवारी, 2026 पासून नियमित खरेदी-विक्रीसाठी पुन्हा खुली होईल.
मुंबई, 08 जानेवारी 2026: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (‘महिंद्रा फायनान्स’) आणि मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट (सिंगापूर) पीटीई. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाने ‘महिंद्रा मॅन्युलाइफ इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज फंड’ (योजना) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना असून, विविध क्षेत्रांमध्ये बदल करणाऱ्या आमूलाग्र आणि विघटनकारी नवोपक्रमांमुळे निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन वाढीच्या संधींचा फायदा घेणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही नवीन फंड ऑफर (NFO) 9 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल आणि 23 जानेवारी 2026 रोजी बंद होईल. तर 2 फेब्रुवारी 2026 पासून ही योजना सतत खरेदी-विक्रीसाठी पुन्हा खुली होईल.
नावीन्यपूर्ण संकल्पना अवलंबणाऱ्या कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ साधणे हा या योजनेचा उद्देश आहे. उत्पादन, प्रक्रिया आणि सेवांमधील नावीन्यपूर्णतेद्वारे महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणणाऱ्या नावीन्यपूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यावर ही योजना लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये उद्योगांना नव्याने आकार देणाऱ्या मूलभूत प्रगती आणि विघटनकारी बदलांचा समावेश असेल.
एकूण मालमत्तेपैकी 80% ते 100% रक्कम ही योजना इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवेल. यात नावीन्यपूर्ण संकल्पना (इनोव्हेशन थीम) अवलंबणाऱ्या कंपन्यांच्या योजनेच्या इक्विटी घटकाच्या 50% पर्यंत इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जचा समावेश आहे. यासोबतच ही योजना तिच्या मालमत्तेपैकी 0-20% रक्कम नावीन्यपूर्ण संकल्पनेबाहेरील कंपन्यांच्या इक्विटी साधनांमध्ये देखील गुंतवेल. REITs च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करण्याची आणि योजनेच्या निव्वळ मालमत्तेच्या 20% पर्यंत परदेशी सिक्युरिटीजमध्ये (परदेशी म्युच्युअल फंडांनी जारी केलेल्या युनिट्स/सिक्युरिटीजसह) आणि एकूण मालमत्तेच्या 20% पर्यंत कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये (सरकारी सिक्युरिटीजमधील TREPS आणि रिव्हर्स रेपोसह) आणि InvITs द्वारे जारी केलेल्या युनिट्समध्ये 10% पर्यंत गुंतवणूक करण्याची लवचिकता या योजनेकडे आहे.
महिंद्रा मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ अँथनी हेरेडिया म्हणाले, “दीर्घकालीन बदलामध्ये सर्वात शक्तिशाली दीर्घकालीन चालक म्हणून नवनवीन संकल्पनांकडे पाहिले जाते. तंत्रज्ञान, नवीन व्यवसाय मॉडेल आणि विविध उद्योगांमधील संरचनात्मक परिवर्तनाद्वारे भविष्य घडवणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना देण्यासाठी ‘इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज फंड’ तयार करण्यात आला आहे.”
इक्विटी संशोधन आणि गुंतवणूक व्यवस्थापनाचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या सुश्री कीर्ती दळवी (फंड मॅनेजर – इक्विटी) यांच्याद्वारे या फंडाचे व्यवस्थापन केले जाईल. भांडवली वस्तू, अभियांत्रिकी आणि ग्राहक टिकाऊ वस्तूंसारख्या क्षेत्रांमध्ये इक्विटी संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या श्री. रंजीत सिवराम राधाकृष्णन (फंड मॅनेजर आणि विश्लेषक) यांचेही त्यांना सहकार्य असेल.
महिंद्रा मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ – इक्विटी, कृष्णा संघवी म्हणाले, “भारत अशा टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे नावीन्यता आता काही निवडक क्षेत्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही – संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक फायद्यासाठी त्याचा प्रमुख वाटा आहे. उत्पादन आणि वित्तीय सेवांपासून ते आरोग्यसेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि स्वच्छ ऊर्जेपर्यंत, नावीन्यतेचा स्वीकार करणाऱ्या कंपन्या या वाढीचे टिकाऊ मॉडेल तयार करत आहेत. यामुळे दीर्घकाळात विस्तार करण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे, अशाच व्यवसायांसाठी हा फंड तयार करण्यात आला आहे.”
या योजनेच्या मालमत्ता वाटपाच्या पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना^* अवलंबणाऱ्या कंपन्यांचे इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधने (80% – 100%), वर नमूद केलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त* इतर कंपन्यांचे इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधने (0-20%), कर्ज आणि मुद्रा बाजार रोखे#$ (सरकारी रोख्यांमधील TREPS आणि रिव्हर्स रेपोसह) (0-20%) आणि InvITs द्वारे जारी केलेले युनिट्स (0-10%) यांचा समावेश आहे.
नोट्स: ^योजनेच्या इक्विटी घटकाच्या 50% पर्यंतच्या मर्यादेपर्यंत इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जचा समावेश करून.
*आरईआयटीच्या युनिट्समधील आणि परदेशी सिक्युरिटीजमधील (परदेशी म्युच्युअल फंडांनी जारी केलेल्या युनिट्स/सिक्युरिटीजसह) गुंतवणुकीचा यात समावेश आहे. परदेशी सिक्युरिटीजमधील (परदेशी म्युच्युअल फंडांनी जारी केलेल्या युनिट्स/सिक्युरिटीजसह) गुंतवणूक योजनेच्या निव्वळ मालमत्तेच्या 20% पर्यंत असेल.
#मनी मार्केट साधनांमध्ये कमर्शियल पेपर्स, कमर्शियल बिल्स, ट्रेझरी बिल्स, एक वर्षापर्यंतची उर्वरित मुदत असलेल्या सरकारी रोखे, कॉल किंवा नोटीस मनी, डिपॉझिट सर्टिफिकेट, युसान्स बिल्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी निर्दिष्ट केलेली इतर कोणतीही तत्सम साधने यांचा समावेश होतो.
$ही योजना, विनियमनांच्या सातव्या अनुसूचीच्या कलम 4 चे पालन करण्याच्या अधीन राहून, योजनेच्या निव्वळ मालमत्तेच्या 10% पर्यंत निधीच्या कर्ज आणि/किंवा लिक्विड म्युच्युअल फंड योजनांच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करू शकते. तपशीलवार मालमत्ता वाटप, गुंतवणूक धोरण, योजनेचे विशिष्ट जोखीम घटक आणि अधिक तपशिलांसाठी, कृपया महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाच्या ‘महिंद्रा मॅन्युलाइफ इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज फंड’ चा योजना माहिती दस्तऐवज आणि प्रमुख माहितीपत्रके वाचा, जे MMIMPL आणि कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या गुंतवणूकदार सेवा केंद्रांवर उपलब्ध आहेत आणि तसेच www.mahindramanulife.com येथेही उपलब्ध आहेत.
**नवीन फंड ऑफर दरम्यान योजनेसाठी नियुक्त केलेले उत्पादन लेबलिंग/जोखमीची पातळी ही योजनेच्या वैशिष्ट्यांच्या किंवा मॉडेल पोर्टफोलिओच्या अंतर्गत मूल्यांकनावर आधारित आहे आणि प्रत्यक्ष गुंतवणूक झाल्यावर नवीन फंड ऑफरनंतर त्यात बदल होऊ शकतो.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

