• अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) च्या 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित
• प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – सोमवार 12 जानेवारी 2026
• बोली / ऑफर सुरू होण्याचा दिनांक – मंगळवार, 13 जानेवारी 2026 आणि बोली / ऑफर
बंद होण्याचा दिनांक – शुक्रवार, 16 जानेवारी 2026
• 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल
8 जानेवारी 2026: अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी प्रती इक्विटी शेअर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या इक्विटी समभागांची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस हा बोली / ऑफर सुरू होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी, म्हणजे सोमवार, 12 जानेवारी 2026 आहे. बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 16 जानेवारी 2026 आहे.
ऑफरसाठी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343 रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स”)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल
प्राथमिक समभाग विक्रीमध्ये एकूण 8,160.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री समभागभागधारकांकडून 26,942,343 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.
ऑफर फॉर सेल मध्ये पीआय ऑपर्च्युनिटीज फंड I कडून 9,889,646 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अॅक्सेल इंडिया VI (मॉरिशस) लिमिटेड कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ट्रुडी होल्डिंग्स कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पीआय ऑपर्च्युनिटीज फंड II कडून 3,411,792 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, नॉरवेस्ट व्हेंचर पार्टनर्स X – मॉरिशस X कडून 3,381,721 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “गुंतवणूकदार विक्री समभागभागधारक”); तसेच राहुल गर्ग यांच्याकडून 60,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, रजत गर्ग कडून 22,725 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, कोल्लेंगोडे रामनाथन लक्ष्मीनारायण यांच्याकडून 18,495 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रेम गुप्ता यांच्याकडून 10,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि राजेश रामय्या यांच्याकडून 2,800 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “वैयक्तिक विक्री समभागधारक”) समाविष्ट आहे.
कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, IIFL कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

