पुणे-बुधवार दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी प्रभाग क्रमांक 21 मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क मधील सिटी इंटरनॅशनल स्कूल ते शिवशंकर सभागृह, झांबरे पॅलेस यांसह संपूर्ण महर्षीनगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या रॅलीला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.सातत्याने भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेल्या या प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर,मनिषा प्रविण चोरबेले यांच्या प्रचारार्थ या भागात भव्य पदयात्रा देखील संपन्न झाली.
भारतीय जनता पक्षाने या भागात केलेल्या सुनियोजित विकासामुळे या परिसराला पुणे शहरातील विकसित परिसर म्हणून ओळखले जाते. नागरिकांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी तत्पर असे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिले जातात. कायम लोकांच्या संपर्कात असणारे उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय. याच उत्साहाच्या बळावर भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पॅनल या परिसरात विजयी होईल, असा विश्वास पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा उमेदवार श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.तसेच प्रभाग क्रमांक २१ – मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क प्रभागातील भारतीय जनता पार्टी, आर. पी.आय.(आठवले गट) व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना “कमळ” या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.यावेळी माजी नगरसेविका वंदनाताई भिमाले,कविताताई वैरागे,प्रवीण चोरबोले, राजश्रीताई शिळीमकर, पुणेशहर युवमोर्चा सरचिटणीस अभिषेक भिमाले उपस्थित होते.

