पुणे. दि.७: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री योगेश रामदासभाई कदम यांची आज दि.७ जानेवारी रोजी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर नेतेही या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर – नागपूरचाळ) मधील शिवसेना – रिपब्लिकन सेना युतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. रिंकू शैलेंद्र मोरे, ॲड. विजयकुमार भुजंगराव ढाकणे आणि विपुल राजेंद्र दळवी यांच्या प्रचारासाठी सायंकाळी ६:३० वाजता नागपूरचाळ ते हौसिंग बोर्ड, ईशान्य मॉल पर्यंत भव्य पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेला गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर, प्रभाग क्रमांक ६ (येरवडा-गांधीनगर) मधील शिवसेना पक्षाच्या उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, वाघचौरे कोमल अभिजीत, स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी ७:०० वाजता येरवडा गांधीनगर येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आमदार रवी धंगेकर, अजय भोसले, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी उपस्थित राहतील.
रात्री ८:३० वाजता प्रभाग क्रमांक ३४ (नर्हे-वडगावबु.-धायरी) मधील शिवसेना उमेदवार गिरमे निलेश दशरथ, गिरमे राधिका दशरथ, सुप्रिया ईश्वर भूमकर आणि तांबे विठ्ठल ज्ञानेश्वर यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील कालभैरव मंदिर चौक, नर्हे रोड येथे योगेश कदम यांची आणखी एक जाहीर सभा आयोजित आहे. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे, रवी धंगेकर आणि युवासेना प्रदेश सचिव किरण साळी उपस्थित राहणार आहेत.

