पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, व्यायामासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी वर्तक बाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारस बाग, महाराणा प्रताप उद्यान व साठे उद्यान या ठिकाणी व्यायामप्रेमी नागरिकांशी संवाद साधला.
या वेळी नागरिकांशी चर्चा करताना राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले, ‘आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅकची उभारणी करणार आहोत. व्यायामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, मतदार संघ अध्यक्ष अमित कंक, बिपिन बोरावके, मनीष जाधव, किरण जगदाळे, कुणाल आहेर, धनंजय डिंबळे व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

