पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखिल भारतीय काँग्रेस पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधीकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश रमेश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांनी आजच्या प्रचाराची सुरुवात सर्वधर्मीय समाजासोबत काशेवाडी येथील हजरत चमनशाह दर्ग्यात जाऊन चादर अर्पण करून केली .त्याबरोबरच मुस्लिम समाजाच्या महिलांनी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करीत पाठिंबा दर्शविला .
आजच्या पदयात्रेदरम्यान काशेवाडी येथील हातगाडी ,भाजीपाला विक्रेते तसेच परिसरातील पथारी व्यावसायिक यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .व त्यांचाशी मुक्तपणे संवाद साधला .
या पदयात्रेत मुस्लिम महिला व युवक अतिशय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .कॉंग्रेस पक्षाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .ठिकठिकाणी जेष्ठ नागरिक घरातून बाहेर येऊन मनोभावे आशीर्वाद देत होते .या पदयात्रेत माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे, विठ्ठल थोरात, बाकेर बागवे, दयानंद अडागळे, हुसेन शेख,राजू मोरे, मोहन माने, दिलीप कांबळे, हुसेन हमजू शेख, रफीक पठाण, दीपक गायकवाड, जाहिदा शेख, सुनील शेंडगे, मारुती कसबे,बापू कसबे व परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .
कॉंग्रेसच्या उमेदवारांकडून हातगाडीवाले ,भाजीपाला विक्रेते तसेच परिसरातील पथारी व्यावसायिक यांच्या गाठीभेटी
Date:

