पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अंशदायी
वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत ९०-१० स्कीम द्वारे परिवहन महामंडळाचे पॅनेलवरील हॉस्पिटल्समध्ये वैद्यकीय उपचार
दिले जातात. या योजनेमुळे कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांवर होणाऱ्या खर्चापासून मोठा दिलासा
मिळतो.
तथापि, अंशदायी वैद्यकीय योजनेच्या वर्गणीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून होणारी कपात व तेवढाच
महामंडळाचा हिस्सा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वर्गणीतून जमा होणारा निधी हॉस्पिटल्स व कर्मचाऱ्यांच्या
देयकांपोटी अदा करावयाच्या रकमेच्या तुलनेत फार कमी प्रमाणात जमा होतो. त्यामुळे हॉस्पिटल व कर्मचाऱ्यांची देयके
अदा करण्यात अडचणी निर्माण होतात.
उपरोक्त वस्तुस्थितीमुळे देयकांच्या अदायगीमध्ये अडचणी निर्माण होत असल्या तरीदेखील कर्मचाऱ्यांना व
त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत अल्प दरात वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक असल्याने परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी हॉस्पिटल्सची देयके टप्प्याटप्प्याने अदा करणेबाबत प्रशासनास सूचित
केले आहे.
त्यानुसार परिवहन महामंडळाचे पॅनेलवर असलेल्या हॉस्पिटल्स पैकी भारती हॉस्पिटल धनकवडी, पवार
हॉस्पिटल बालाजीनगर, एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल महंमदवाडी, सिध्दीविनायक हॉस्पिटल उरळीकांचन, के.जी.आनंद
हॉस्पिटल धनकवडी, धनश्री हॉस्पिटल चिंचवड, ए.एस.जी. आय हॉस्पिटल शिवाजीनगर, कोहाकडे हॉस्पिटल चंदननगर,
शिवम हॉस्पिटल फुरसुंगी, होरायझन हॉस्पिटल फुरसुंगी, विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर, नोबल हॉस्पिटल हडपसर,
ऑरा हॉस्पिटल आंबेगाव बु., ओम हॉस्पिटल भोसरी, धन्वंतरी हॉस्पिटल सासवड यांचे देयकांपोटी रक्कम रूपये
८,३७,२०,१८८/- (अक्षरी रक्कम रूपये आठ कोटी सदतीस लाख वीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी) इतकी रक्कम अदा करणेत
आलेली आहे.
त्याचबरोबर उपरोक्त हॉस्पिटल्सची उर्वरीत देयके व पॅनेलवरील इतर हॉस्पिटल्सची देयके परिवहन
महामंडळाकडे निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने अदा करणेत येणार आहेत. दरम्यान, देयकांच्या थकबाकीमुळे
परिवहन महामंडळाचे कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचार नाकारण्यात येवू नयेत असे
आवाहन परिवहन महामंडळाकडून पॅनेलवरील सर्व हॉस्पिटल्सना पत्राद्वारे करणेत आलेले आहे.
PMPML कडून कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत रुग्णालयांना आठ कोटी सदतीस लाख अदा
Date:

