उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
पुणे.दि.७: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जोमात प्रचार करत आहे. मंगळवारी(दि. ६ जानेवारी) प्रभाग क्रमांक १ (कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित) मधील उमेदवार जैवळ गिरीश भीमराव, बनसोडे हेमलता विवेक, रावते प्रदीप लक्ष्मण आणि म्हस्के मीनाक्षी सतीश यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच प्रभाग २८ (जनता वसाहत व हिंगणे खुर्द) मधील उमेदवार मीरा राहुल तुपेरे, नलिनी योगेश आढाव, कुडले शीतल अतुल आणि नितीन कैलास हनमघर यांच्या प्रचारासाठीही डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, संदीप शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याने अनेक महिलांना त्याचा फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. सत्ता आल्यावर पीएमपीएमएलमध्ये महिलांना अर्धे तिकीट, प्रत्येक प्रभागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची योजना आहे. युवकांना कौशल्य विकासाद्वारे रोजगार, गोरगरीब जनतेला वैद्यकीय सहाय्यता यांवर देखील भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

