पुणे:स्वच्छ, सुंदर,आरोग्यदायी, प्रदूषण विरहीत प्रभागासाठी झटणे माझे पहिले कर्तव्य असून त्यासाठी मी झोकून देऊन काम करत राहील असे येथे भाजपचे प्रभाग 21 चे उमेदवार ,माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले.
काल मंगळवार ०६ जानेवारी २०२६ रोजी अंगाकरी संकष्टी चतुर्थी निमित्त प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील युवा संदेश मित्रमंडळ, संदेश सोसायटी, संत रामदास मित्र मंडळ आणि महर्षी नगर येथील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी माजीनगरसेविका वंदनाताई भिमाले,कविताताई वैरागे,प्रवीण चोरबोले, राजश्रीताई शिळीमकर, पुणेशहर युवमोर्चा सरचिटणीस अभिषेक भिमाले उपस्थित होते.
तसेच प्रभाग क्रमांक २१ – मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क प्रभागातील भारतीय जनता पार्टी, आर. पी.आय.(आठवले गट) व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना “कमळ” या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.

