लोकनेते स्व. विलासरावांच्या स्मृती – आठवणी’ लातूर पुर्त्या मर्यादित नाहीत तर राज्यभर रुजल्यात..!

Date:

.दिवंगत मुख्यमंत्र्यां विषयी भाजपाध्यक्षांचे विधान असुयायुक्त व विकृती दर्शवणारे..!
– काँग्रेस कडून निषेध
व्यक्त..
पुणे दि ६ जाने –
भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी (लातूर मधील प्रचार सभेत दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे विषयी) ‘लातुरकर विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसुन टाकतील’ असे अहंकारी, असुयायुक्त व विकृती दर्शवणारे विधान सत्तेच्या धुंद नशेत केले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी तीव्र निषेध केला.
ते पुढे म्हणाले की, लोकनेते स्व. “विलासरावांच्या स्मृती – आठवणी’ लातूर पुर्त्या मर्यादित” नाहीत राज्यभर रुजल्या असून स्व विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री होते याचे भान ठेवावयास हवे होते.
राज्यातील ‘शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर’, पित्या सोबत मातेचे नांव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी स्वपुढाकाराने घेतल्याने, राज्यातील माता भागिनींची प्रतिष्ठा उंचावण्याचेच काम त्यांनी केले.
तसेच स्व विलासरावजी यांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते स्व गोपीनाथ मुंडे यांना विरोधीपक्ष नेते पद बहाल करून त्यांचा मान सन्मान सदैव जपला तसेच राजकीय मतभेद कायम ठेऊनही त्यांच्या व गोपीनाथ मुंडेंच्या निखळ मैत्री’चा अध्याय देखील महाराष्ट्राने अनुभवला होता.
गुजरात मधील भूकंप समयी काँग्रेसअध्यक्षा श्रीमती सोनियाजींच्या निर्देशानुसार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी गुजरात मधील काही गांवे दत्तक घेऊन पुनर्वसन केले होते.. या त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे किमान स्मरण रविंद्र चव्हाणांनी ठेवले पाहिजे होते, मात्र भाजप’च्याच् ज्येष्ठ व दिवंगत नेत्यांचे संस्कार व आठवणी पुसणाऱ्या भाजप’च्या विद्यमान व्यवसायिक नेत्यांना ते कसे राहणार असा उपरोधिक टोला ही काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ७: भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे...

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

पुणे, दि. 7 : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप...

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

• उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई, दि. ७ :...