पुणे : प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई येथील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या वेळी अनेक ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करत आशीर्वाद दिले.
हा संवाद दौरा शनिवार पेठेतील आपटे घाट, महालिरकर टेकडी, उभा शनिवार, तांबे बोळ, घोडके आळी, वीर मारुती चौक, कडबे आळी, हसबनीस बखळ, काळभे वस्ती, मेहुनपुरा तसेच शनिवार पेठेतील विविध परिसरांमध्ये पार पडला. यावेळी नागरिकांनी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालय व ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ मार्फत कौतुक करत, झालेल्या कामांच्या आठवणी सांगितल्या. भविष्यात अधिक कामाची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रचार दौऱ्यात कसबा मतदारसंघ सरचिटणीस निलेश कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, धनंजय डेंबळे, उमेश नवरे, अनंत कुंटे, राम दहाड, भूषण बोकील, अतुल मुरकुटे, अमित मुनोत, सर्वेश पवार, मनीष जाधव, ओंकार डिंबळे, कौस्तुभ गोखले, महेश काटदरे, यश थोपटे, कौस्तुभ गाडे आणि संतोष नामजोशी सहभागी झाले होते. यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षालाच विजयी करण्याचे आश्वासन दिले.

