पुणे- प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्न भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर, मनिषा प्रविण चोरबेले यांच्या प्रचारात बाबा मिसाळ ,आमदार सुनील कांबळे सहभागी होत असून घरोघरी सुरु केलेल्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. आंबेडकर नगर,मार्केट यार्ड, प्रेमनगर या भागात पदयात्रा संपूर्ण झाली.आंबेडकर नगर,मार्केट यार्ड येथे मिसाळ आणि कांबळे यांनी विकास आणि विश्वासाच्या जोरावर ही लढाई निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास येथील रॅलीतून व्यक्त केला आहे. .

प्रसंगी आमदार सुनील कांबळे,महाराष्ट्र प्रदेश भाजपा निमंत्रित कार्यकारणी सदस्य बाबाशेठ मिसाळ माजी नगरसेविका वंदनाताई भिमाले,कविताताई वैरागे,प्रवीण चोरबोले, राजश्रीताई शिळीमकर, पुणेशहर युवमोर्चा सरचिटणीस अभिषेक भिमाले उपस्थित होते.
घरोघरी होणाऱ्या स्वागतासमयी भिमाले आपल्या मतदारांशी संवाद साधत असून , झोपडपट्टी वासियांना पक्की घरे ,युवकांना रोजगार या बरोबर आरोग्य विषयक विचारपूस करत आहेत .

