स्वयं पुनर्विकासातून झोपडपट्टीवासीयांना ‘आहे तिथे हक्काची घरे’ देणार!

Date:

आबा बागुल यांचा निर्धार: प्रभागासह संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करणार

पुणे-
स्वयं पुनर्विकासातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना ‘आहे तिथे हक्काची घरे’ देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागासह संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि प्रत्येक झोपडपट्टीवासियाचे हित जोपासण्याची जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे प्रत्येक झोपडपट्टीधारकाला ‘आहे तिथे हक्काची घरे’ कायदेशीररित्या देण्याचा निर्धार असल्याचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांची शाहू वसाहत येथे झालेल्या प्रचार सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी एसआरएबाबत व्यथा मांडल्या. त्यावर आबा बागुल म्हणाले, आज झोपडपट्टीवासीय एसआरए योजनेतील अनागोंदीच्या कारभारामुळे त्रस्त आहेत. मूठभर विकसकांच्या फायद्यासाठी झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडपट्टीवासियांनाच वेठीस धरले जात आहे.धाक दडपशाहीच्या जोरावर गरिबांचे छत्र हिसकवण्याचा कारभार सुरु आहे. त्यामुळे अशा या ‘एसआरए’ योजनेला माझा तीव्र विरोध आहे. शाहू वसाहत, दाते बस स्टॉप, तावरे कॉलनी, ५४/२ अण्णाभाऊ साठे वसाहत, संजयनगर, पद्मावती वसाहत असो प्रभागातील प्रत्येक झोपडीधारकाचे जीवनमान उंचावणे ही माझ्यासाठी योजना नाही,तर हा माझा शब्द आहे.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर प्रभागच काय संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि प्रत्येक झोपडपट्टीवासियाचे हित जोपासण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे कोणत्याही झोपडपट्टीवासीचा हक्क हिरावला जाणार नाही हे शिवसेनेचे धोरणच आहे. त्यामुळे स्वयं पुनर्विकासातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना साडेसहाशे स्के. फुटाचे आहे तिथे घर मिळणार आहे. अशी ग्वाही आबा बागुल यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...