पुणे दि.५: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मुकुंद नगर-सॅलीसबरी पार्क प्रभाग २१ मधील शिवसेना उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन मुकुंद नगर येथे जोरदार जल्लोषात करण्यात आले. या उमेदवारांमध्ये अर्चना एकनाथ ढोले, विशाल सुंदरराव सरोदे, पूजा सुधीर नरवडे आणि दिनेश पंडित खराडे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला श्रीकांत पुजारी, संदीप शिंदे, एकनाथ ढोले, सामाजिक कार्यकर्त्या यमुना महेश फडतरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
राज्यभरातील एकल महिलांच्या समस्या लक्षात घेऊन शिंदे साहेबांनी त्यांच्यासाठी विविध योजना सुरू केल्या आणि त्यांना आधार दिला. गोरगरिबांची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी यासाठी आनंदाचा शिधा योजना सुरू केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहिण योजना आणली. तसंच समाजातील सर्व घटकांसाठी असलेल्या महामंडळांना निधी देण्याचं महत्त्वाचं काम शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं, असं डॉ. गोऱ्हे यांनी सांगितलं.
आगामी काळात युवकांना जास्तीत जास्त रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं यासाठी कौशल्य विकास उपक्रम राबवले जाणार आहेत. तसंच मुलींसाठी शैक्षणिक सहायता योजना सुरू करणार असल्याच डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.
या कार्यक्रमाने प्रभाग २१ मधील शिवसेनेच्या निवडणूक मोहिमेला बळकटी मिळाली असून, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

