— काँग्रेस – शिवसेना (ठाकरे ) पक्षाच्या कासेवाडी डायस प्लॉट प्रभागातील उमेदवारांचे घरोघरी उत्साहात स्वागत —
पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २२ मधील अखिल भारतीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफिक शेख ,दिलशाद शेख यांचे डायस प्लॉट वसाहतीत घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले .या उमेदवारांनी आज वसाहतीतील प्रत्येक घरी जाऊन स्थानिक समस्या व अडचणी जाणून घेतल्या .आगामी काळात येथील शिक्षण , पाणी ,रस्ते व स्वच्छता या प्रमुख प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन देखील देण्यात आले .अचानक चक्क उमेदवार रस्त्यावर नाही तर प्रत्यक्ष घरोघरी भेट द्यायला आल्याने परिसरातील महिलांनी औक्षण करीत उत्साहाने स्वागत केले .
डायस प्लॉट ही वसाहत फार वर्षापासून आहे .येथील नागरिकांना आगामी काळात सर्व सुविधा प्राधान्याने मिळवून देणार असून त्यांनी वॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन माजी नगरसेवक व उमेदवार अविनाश बागवे यांनी यावेळी केले .
या पदयात्रेत विठ्ठल थोरात ,यासर बागवे ,दयानंद अडागळे,
शिलार रत्नागिरी , धरम कांबळे, महेबुब नदाफ, युनूस शेख, शिवाजी भोसले, बाबा सरोदे, सुभाष दुबळे, सचिन घोलप यासह डायस प्लॉट वसाहतीतील जेष्ठ नागरिक ,महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
डायस प्लॉट वसाहतीत काँग्रेस-ठाकरे शिवसेना उमेदवारांचा घरोघर प्रचार
Date:

