ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

Date:

पुणे : भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन एका अनोख्या आणि भावनिक सोहळ्यात पार पडले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

‘निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून, संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी आम्हा उमेदवारांवर असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि परिश्रम आहेत. त्याच भावनेतून प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगी, ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, रमेशजी परचुरे, किरणजी सरदेशपांडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला,’ असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले.

या हृद्य सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ, श्रेयस लेले यांचीही उपस्थिती लाभली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात एका दिवसात 254 मृत्यूइराणने म्हटले- युद्धविराम आणि युद्ध एकत्र नाही चालू शकत

लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये एकाच दिवसात २५४ जण ठार...

भाजपच्या माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर तर सह माध्यम प्रमुख पदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती

मुंबईभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यम प्रमुख पदी...

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक...