‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न ! असंख्य नागरिकांच्या समस्या मार्गी

Date:

पुणे : गेली तीन वर्षे पुणे महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. छोट्या–मोठ्या नागरी समस्यांसाठी महापालिकेत वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेला ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

महापालिका अस्तित्वात नसतानाही सक्षम यंत्रणा उभी करून बिडकर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवला आहे. पाणीपुरवठा, बांधकाम परवाने, मलनिःसारण, रस्ते, देखभाल-दुरुस्ती, पथ विभाग तसेच सांस्कृतिक विभागाशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी नागरिकांना थेट अधिकाऱ्यांकडे जावे लागत होते. मात्र या उपक्रमामुळे नागरिकांचा एक फोन येताच तक्रारींची दखल घेऊन थेट जागेवर जाऊन समस्या सोडवण्याची कार्यक्षम यंत्रणा कार्यरत आहे.

यासंदर्भात नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासन काळात नगरसेवक नसल्याने निर्माण झालेली पोकळी ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ उपक्रमामुळे भरून निघत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली टीम सातत्याने राबत असून, समस्या प्रलंबित न ठेवता तातडीने तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे.

याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असतो. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी, या उद्देशातूनच ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम सुरू केला. महापालिका नसली तरी नागरिकांच्या समस्या थांबत नाहीत; त्यामुळे त्या सोडवणे ही आमची जबाबदारी आहे.”

या उपक्रमामुळे प्रभाग २४ मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासन काळातही लोकप्रतिनिधींची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे हे ठळक उदाहरण ठरत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे-पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी...

अजितदादांवर टीकेचे मोहोळ

पुणे : २५ वर्षे पुणे तुमच्या...

पुण्यात ८० हजार कोटींच्या विकासकामांच्या योजना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, प्रतिनिधी – पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात सुमारे...

बावधनमध्ये विवा हॉलमार्क सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग

पुणे:बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजसमोरील (Pune News) विवा हॉलमार्क सोसायटीमध्ये...