पुणे- अवघ्या १७ ते २० वयोगटातील कात्रजच्या ७ मुलांना पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपावरून दरी पुलाखाली पहाटे पावणेचार वाजता पकडले आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार ओंकार जगताप (नेमणूक क्राईम युनिट २ अंतर्गत कॉम्प २४ मार्फत आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर)फिर्याद नोंदविली आहे.
१) समीर नामदेव काळे, वय १९ वर्षे, रा. माऊली ट्रेडर्स नावाचे दुकानाच्या शेजारील बिल्डींग गणेश अर्पाटमेन्ट, दुसरा मजला, फलॅट नंबर ४ येथे भाड्याने, वाघजाईनगर, कात्रज, पुणे २) निवृत्ती संजय जाधव, वय २० वर्षे, रा. सदगुरु मित्र मंडळा शेजारी, अटल ७, रुम नंबर ४, सच्चाई माता मंदिराच्या मागे, कात्रज, पुणे ३) साहिल एकनाथ मळेकर, वय १९ वर्षे, रा. रंगा शेठ चौकाच्या जवळ, साईनगर, गल्ली नंबर ५, कात्रज, पुणे ४) पियुष अमोल जगताप, वय १९ वर्षे, रा. सदगुरु मित्र मंडळा शेजारी, अटल ७, रुम नंबर ३१, सच्चाई माता मंदिराच्या मागे, कात्रज, पुणे ५) सिध्देश गणेश फाटक, वय २० वर्षे, रा. सदगुरु मित्र मंडळा शेजारी, अटल १४, रुम नंबर १४, सच्चाई माता मंदिराच्या मागे, कात्रज, पुणे ६) निखिल रामचंद्र खुटवड, वय २० वर्षे, रा.अटल १०, मातोश्री सुपर मार्केट दुकानाच्या वरील तिसरा मजला, सच्चाई माता मंदिराच्या मागे, कात्रज, पुणे (अटक), ७) एक विधीसंर्घषित बालक (ताब्यात)यांना दि. ०३/०१/२०२६ रोजी १५/४५ वा. दरम्यान दरी पुलाच्या खाली आंबेगांव खुर्द, येथे पोलिसांनी पकडले
हे सर्व दरोडा घालण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे एकत्रितपणे जमुन त्यांचेजवळ पाच लोखंडी हत्यारे व दोन मच्छर मारण्याची अर्धवट भरलेली स्प्रे असा एकूण २,०७०/- रु. किं.चा मुददेमाल बाळगुन पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे यांचेकडील आदेश मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळून आले असेही पोलिसांनी म्हटले आहे फौजदार राहुल जोग, मो.नं.८८३०५७४६९६ अधिक तपास करत आहेत.
दरोड्याच्या तयारीतील कात्रजच्या ७ पोरांच्या टोळीला दरीपुलाखाली पहाटे पावणेचार वाजता पकडले
Date:

