पुणे, दि. ४ : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विशेष आरती संपन्न झाली. यावेळी मंदिरात ५१ प्रकारच्या फळे व भाज्यांचा वापर करून साकारण्यात आलेल्या आकर्षक आरासेचे डॉ. गोऱ्हे यांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी दत्तमंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.
शाकंभरी पौर्णिमा ही देवीच्या शाकंभरी अवताराला समर्पित असून, या दिवशी फळे व भाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पुण्यातील हे ऐतिहासिक दत्तमंदिर शाकंभरी पौर्णिमेच्या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीमुळे नेहमीच भाविकांसाठी आकर्षण ठरते.

