कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी अजित पवारांचा खुलासा अत्यंत गंभीर, घायवळला मदत करणाऱ्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा तात्काळ राजीनामा घेऊन सीबीआय चौकशी करा.

Date:

मुंबई, दि. ३ जानेवारी २०२६

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण आयोग हा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, राज्यपाल यांनी अराजकीय भूमिका घ्यायची असते, ते एका अत्यंत महत्वाच्या संवैधानिक पदावर असतात. पण राहुल नार्वेकर हे गुंड, मवाल्यासारखे वागले, विरोधी पक्षाच्या व्यक्तीला दमदाटी केली, त्यांची देहबोली, वर्तन व दमदाटी ही अत्यंत खालच्या पातळीवरची होती, ही शोकांतिका आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती अविरोध निवडून यावेत यासाठी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दरवाजा अडवून थांबले होते, विरोधकांना अर्ज भरू न देणे हे त्यांचे वर्तन अशोभनीय असून त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे.

हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत, त्यांना धमकावणे, त्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश देणे हा काय प्रकार आहे. विधानसभेचे अघ्यक्ष म्हणून ते आदेश देतात, नार्वेकर स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजायला लागले आहेत. निवडून आल्यानंतर घोडेबाजार होतो हे पाहिले होते पण आता निवडणुकीच्या आधीच, जीसकी लाठी उसकी भैंस, प्रकार सुरु झाला आहे. जे बिनविरोध आले ते काय लोकप्रिय आहेत म्हणून नाही. निवडणुका म्हणजे लोकशाही, मतदान पण हे चक्रच खिळखिळे करण्यात येत आहे आणि याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सपकाळ म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ७० हजार कोटी रुपायांच्या भ्रष्टाचारावरच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सत्तेतील लोक भ्रष्ट आहेत, त्यामुळे कोणीच कोणावर कारवाई करू शकत नाही आणि सत्तेतून बाहेरही पडत नाहीत पण अजित पवार यांनी मात्र नरेंद्र मोदी व फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे, असेही सपकाळ म्हणाले.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून पासपोर्ट कायदा, 1967 चा भंग आहे. कुख्यात गुंडांस परदेशात जाण्यास मदत करणे हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचा तात्काळ राजीनामा घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी केली पाहिजे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...