पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी _ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

Date:

पुणे _
यंदाची मनपा निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी आहे. जनतेच्या नागरिक सुविधा चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकते याची ही महत्वपूर्ण निवडणूक आहे. केंद्र आणि राज्य सरकार मध्ये भाजप कार्यरत असून पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी
असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, पुण्यात केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करून पायाभूत सुविधा निर्मिती कामे गतिमान पद्धतीने सुरू आहे. एखादे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ आश्वासन देऊन होत नाही तर त्यादिशेने सातत्याने काम देखील करावे लागते. पुण्यात मेट्रो करण्याबाबत मनपा मध्ये ठराव पूर्वी झाली होते पण केंद्र आणि राज्यात सत्ता असताना देखील महाविकास आघाडीला मेट्रो काम सुरू करता आले नाही.हे प्रकल्प त्यांना सुरू करायचेच नव्हते. पुण्यातील वाहतुकीची कोंडी दूर करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.मात्र, आता केंद्र आणि राज्यातील सरकार गतिमान प्रशासन कसे असावे हे विविध विकास कामातून दाखवून देत आहे.आगामी काळात पुण्यात पायाभूत सुविधांवर ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केंद्र आणि राज्य सरकारने दर्शवली आहे.एक हजार इलेक्ट्रिक बस, मेट्रो जाळे विस्तारीकरण, नदी सुधारणा कार्यक्रम,रिंगरोड, २४/७ पाणी पुरवठा, सेवा,वैद्यकीय, शिक्षण, रोजगार क्षेत्र यांना चालना देण्याचे काम करण्यात येत आहे. यंदा सर्वाधिक परदेशी गुंतवणूक राज्यात आलेली आहे. उद्योगांना चांगले वातावरण राज्यात निर्माण झाल्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केवळ करार न करता प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. देशाला सन २०४७ पर्यंत विकसित देश बनविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.त्यामुळे ही मनपा निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही तर पुढील भविष्य घडवणारी आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या टीकाबाबत चव्हाण म्हणाले, ही टीका केवळ निवडणूक पार्श्वभूमीवर केलेली आहे. नेमके आरोप आणि प्रत्यारोप कसे करावे हे त्यांनी ठरवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत ते सध्या काम करत आहे, त्यांचे नेतृत्व योग्य नाही असे त्यांनी जाहीर करावे. त्यामुळे त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत आरोप केले तर त्यांची अडचण होईल. त्यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव असून त्यांनी केवळ आरोप न करता संबंधित यंत्रणा यांच्याकडे रीतसर तक्रार करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जनतेने मतदान करू नये तर भाजपला करावे.

भाजप मध्ये महत्वपूर्ण पक्ष प्रवेश

याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मतदारसंघातील माजी नगरसेविका शैलजा खेडेकर, अर्चना कांबळे, शिवसेना उबाठा नेते नाना वाळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत पांडुळे,वसुंधरा निरभवने, काँग्रेस शहर उपाध्यक्ष आणि निवृत्त पोलिस अधिकारी अनिल पवार, माजी नगरसेविका शारदा ओरसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रवींद्र ओरसे यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला. याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक सनी निम्हण,आदित्य माळवे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहियानगर एसआरए प्रकल्पातील प्रश्न व अडचणी मार्गी लावणार—रमेश बागवे

पुणे — गेल्या आठ वर्षापासून महापालिका भाजपाच्या ताब्यात...

अजित पवार यांनी केलेली मोफत प्रवासाची घोषणा फसवी:मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पीएमपीएमएल आणि...

सकाळच्या प्रहरी जनसंवादाची वारी! गणेश बिडकरांचा ज्येष्ठ नागरिक, महिला अन् खेळाडूंशी थेट संवाद

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४...