एमआयटी एडीटी विद्यापीठाला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार

Date:

शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रा. डाॅ.सुनिता कराड यांनी स्विकारला सन्मान
पुणे : डिफेन्स फोर्स लीग (डीएफएल) आणि डीआयएफटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपल्या सैन्याला समजावून घ्या’ या संकल्पनेवर आधारित आणि ‘वॉल ऑफ हिरोज’ या जागतिक विक्रमी मोहिमेच्या अधिकृत शुभारंभासाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘डिव्हाईन एव्हिएशन एज्युकेशन अँड कल्चर समिट’मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व दूरदृष्टीपूर्ण योगदानाबद्दल एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ, पुणेला डीएफएलचा प्रतिष्ठेचा ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान विद्यापीठाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी स्वीकारला.
या राष्ट्रीय परिषदेत माजी हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अरुणाचल प्रदेश व मिझोरामचे सन्माननीय राज्यपाल तसेच इंडियन एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष एअर मार्शल शशीकुमार रामदास (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, व्हीएसएम) यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमात उपस्थितांना लाभले.

या प्रसंगी नागरी विमान वाहतूक उपमहासंचालिका श्रीमती सुवरिता सक्सेना, मिग–२१ विमानावर सर्वाधिक उड्डाण तासांचा जागतिक विक्रम करणारे एअर कमोडोर सुरेंद्र त्यागी (वायुसेना पदक), तसेच भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते व पद्मश्री सन्मानित मुरलीकांत पेटकर हे मान्यवर उपस्थित होते. संरक्षण, शिक्षण, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ज्ञांनी परिषदेत सहभाग नोंदवला.

एमआयटी एडीटी विद्यापीठाने उच्च शिक्षणात नवोन्मेष, कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन व उद्योगस्नेही उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर केलेल्या योगदानाची दखल घेत डीएफएलतर्फे हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षणातून राष्ट्र उभारणीचा विचार प्रत्यक्ष कृतीतुन साकार करण्याची विद्यापीठाची भूमिका प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

परिषदेस प्रारंभी १९७१ च्या युद्धातील शहीदांसह भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले यांना एनसीसी कॅडेट्सकडून विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. याच मंचावर डीएफएल आणि डीआयएफटी फाऊंडेशनतर्फे भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथांना समर्पित ‘वॉल ऑफ हिरोज’ ही महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहीम अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड आणि कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या नेतृत्वात एमआयटी एडीटी विद्यापीठाला मिळालेला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार हा विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था, सामाजिक बांधिलकी आणि देशहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग २४ मध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार ! मंगळवार पेठेत तरुणांचा पक्षप्रवेश

पुणे, : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना...

शिळीमकर आणि धूत या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल:१२ वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

पुणे-कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात पतंग उडवताना इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून...

केळेवाडी, हनुमाननगर,जयभवानीनगर परिसरात हर्षवर्धन मानकर यांची पदयात्रा

पुणे- स्वखर्चातून कचरा गाडी सुरू करून केळेवाडी, हनुमाननगर परिसर...

महागाई विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना फाशीची धमकी:सरकारने त्यांना देवाचे शत्रू म्हटले

इराणमध्ये आतापर्यंत 217 मृत्यू, 2600 हून अधिक ताब्यात तेहरान -इराणमध्ये...