मुरलीधर मोहोळ-अजित पवार यांची नुरा कुस्ती : आम आदमी पार्टी

Date:

.. पुणेकरांसाठी एकच सक्षम विरोधी पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी.

कोयता गॅंग गुंडगिरीचे अपघातांचे पुणे शहर आणि कोंबड्यांची झुंज!

‘पुणे- हतबल पुणेकरांच्या समस्या हा कोंबड्याच्या झुंजी सारखा एंटरटेनमेंट चा प्रयोग नाही! त्यामुळे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकमेकांवर आरोप करीत पुणेकरांसाठी नुरा कुस्तीचे शो करू नयेत! जर पुणेकरांच्या समस्यांची एवढी काळजी होती तर गेल्या आठ वर्षांमध्ये काय केले याचा हिशोब द्या. ‘अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे निविदा रक्कम फुगवून कामे लाटली जातात अगदी कचऱ्यातही भ्रष्टाचार केला जातो. महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून कर्जबाजारी झाली आहे अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना पुणे शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे मात्र राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी यादी पाहिली तर ते कोणत्या तत्त्वांमध्ये बसते असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी केला होता.

या वादात आम आदमी पार्टीने आता उडी घेतली असून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादीचे अजित दादा यांच्यामधील चिखलफेक म्हणजे नुरा कुस्ती आहे अशी टीका केली आहे. पिंपरी चिंचवड मधील स्थायी समितीच्या अध्यक्षांनी लाच मागितली होती आणि ते प्रकरण आम आदमी पार्टीने लावून धरले होते. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्या मित्राचे जैन होस्टेल खरेदी प्रकरण, तर अजित दादा यांच्या मुलाचे मुंढवा जमीन प्रकरण याचाही पाठपुरावा आम आदमी पार्टीने केला होता. त्यामुळे सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजितदादा आणि मुरलीधर मोहोळ यांनी आता निवडणुकीपुरते एकमेकावर चिखलफेक करणे म्हणजे नुरा कुस्ती आहे. सत्तेच्यासाठी झालेल्या सर्व युत्या आणि आघाड्या यांच्यापेक्षा आम आदमी पार्टी ही सातत्याने सामान्य माणसाच्या विकासावर काम करीत असून ट्रिपल इंजिन असलेल्या भाजपच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करीत आली आहे असे आप चे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...