२४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार: राघवेंद्र बाप्पु मानकर

Date:

पुणे : नागरिकांच्या सेवेचा ध्यास घेऊन माझे सहकारी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेत अहौरात्र कार्यरत आहोत. आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे हा बाप्पु तुमच्या कुटुंबातील सदस्य; तुमचा मित्र या नात्याने स्वतः २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन,’ असा विश्वास भाजपाचे प्रभाग २५-ब मधील अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी व्यक्त केला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून, शिस्तबद्ध संघटनात्मक बांधणीच्या जोरावर या प्रभाग २५ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा संकल्प करा,’ असे आवाहन आमदार हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांना केले.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभाग २५ च्या उमेदवार स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, भाजयुमो शहर सरचिटणीस प्रणव गंजीवाले, महिला आघाडी मंडल अध्यक्ष मोहना गद्रे, प्रभाग महिला अध्यक्षा रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष श्रेयस लेले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले; तसेच केंद्र व राज्य सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने ही निवडणूक जिंकून शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई मतदारसंघासह शहराला विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्ध थांबले,इराण-अमेरिका 2 आठवड्यांसाठी युद्धविराम

इराण आणि अमेरिका 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत....

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...