रहस्यकथा, भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा

Date:

साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांना जितके महत्त्व साहित्यव्यवहारात मिळायला हवे तितके मिळालेले नाही. त्यामागे आकलनाचा दुष्काळ हेच मुख्य कारण आहे. रहस्यकथा, भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंत यांनी व्यक्त केला.

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर विशेष परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यात प्रसिद्ध भयकथा लेखक हृषिकेष गुप्ते, समीक्षक व लेखक गणेश मतकरी, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक प्रवीण टोकेकर, संभाजीनगरहून आलेले समीक्षक डॉ. गोविंद बुरसे, अमरावतीहून आलेले अभ्यासक डॉ. राजेंद्र राऊत हे सहभागी झाले होते. पत्रकार जयदीप पाठक यांनी त्या सर्वांशी संवाद साधला.

लेखकांनी अद्ययावत व्हावे; वाचकांनी आकलन वाढवावे..

हृषिकेष गुप्ते म्हणाले, मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा दुर्लक्षित असण्याचे कारण त्यामध्ये असणारा आकलनाचा अभाव हेच आहे. भय ही खरे तर आदीम भावना आहे; परंतु भय म्हणजे भूत इथपर्यंतच मर्यादित दृष्टीने आपण पाहिले. वस्तुतः आपले संपूर्ण आयुष्य भीती व गूढपणाने व्यापलेले आहे. भयकथा लेखकसुद्धा रंजनाच्या चौकटीत अडकून राहिले त्यामुळे लेखकांनीही स्वतःला अद्ययावत करणे गरजेचे आहे आणि वाचकांनीही आपले आकलन वाढवायला हवे.

दुष्काळ सुरुवातीपासूनच..

या वेळी गणेश मतकरी म्हणाले, “भयकथा, रहस्यकथा यांचा दुष्काळ अगदी सुरुवातीपासूनच आहे. रहस्य साहित्य मुख्य धारेतील साहित्य मानले न गेल्याने कायमच दुय्यम लेखले गेले. रत्नाकर मतकरी, नारायण धारप अशा काही लेखकांचे अपवाद वगळता आपल्याला या विषयात लिहिणारी किती नावे आज आठवतात? त्यासाठी अधिक समकालीन लेखन नव्याने होणे गरजेचे आहे. गूढकथा हा एक लोकप्रिय प्रकार नक्कीच होऊ शकतो; मात्र त्यामध्ये अधिकाधिक लेखकांनी उतरून त्या प्रकारचे लेखन करण्याचे आवाहन घ्यायला हवे.”

आजही समाजमान्यता नाही..

प्रवीण टोकेकर म्हणाले, रहस्यकथा, भयकथा आणि गूढकथा हे स्वतंत्र प्रकार आहेत वाचक हा त्यांचा साक्षीदार आहे. पूर्वीच्या काळात हे चोरून वाचायचे साहित्य म्हणून गणले गेले. आजही त्याला म्हणावे तशी समाजमान्यता मिळालेली नाही हे वास्तव आहे. वाचकांच्या आकलनाचा प्रश्न आहेच पण तो सन्माननीयही मानला जात नाही. परदेशातही हे साहित्य ‘पल्प फिक्शन’ समजले जाते. या साहित्याकडे सापत्नभावाने पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. भयकथा, रहस्यकथा लिहिताना लेखकाचा कस लागतो. त्यासाठी खरी बुद्धिमत्ता लागते. खूप आव्हानात्मक असे हे लेखन असल्यामुळे या लेखनाला स्वतंत्र साहित्य प्रकार म्हणून दर्जा मिळायला हवा.

मराठीत प्रमाण कमी..

डॉ. राजेंद्र राऊत म्हणाले, चोरून वाचायचे साहित्य आणि हे साहित्य वाचून पिढी बिघडेल अशी भीती पूर्वी व्यक्त केली जात असे त्यातून हा वाङ्मय प्रकार दुर्लक्षित राहिला. आजकाल हिंदी तसेच अन्य भाषांमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात रहस्यकथा, भयकथा व गूढकथा लिहिल्या जातात तेवढे प्रमाण मात्र मराठीत दिसून येत नाही. आपण त्यात खूप मागे पडतो आहोत. 

दर्जेदार लेखनाची वानवा..

डॉ. गोविंद बुरसे म्हणाले, लोकांना या विषयात खूप रस आहे. त्यांना समजून घेण्याचीही खूप इच्छा आहे परंतु दुर्देवाने या विषयात दर्जेदार लेखनाची वानवा आहे. हे चित्र बदलण्यासाठी अनेकांनी पुढे येऊन या विषयांत लेखन करायला हवे.

९९ वर्षांत पहिल्यांदाच हे घडतंय…

गेल्या ९९ वर्षांत पहिल्यांदाच रहस्यकथा, भयकथा आणि गूढकथा या विषयावर असा एखादी परिचर्चा आयोजित करण्यात आली आहे, त्यासाठी संमेलनाच्या आयोजकांचे विशेष आभार मानायला हवे, असे गौरवोद्गार सहभागी सर्व अभ्यासक-लेखकांनी काढले. या विषयाला महत्त्वाचे मानून पहिल्यांदाच या विषयावर गांभीर्याने चर्चा घडवून आणणे हे खरोखरीच आशादायक चित्र आहे. या मंथनातून नक्की काहीतरी चांगले गवसेल अशी भूमिका मांडण्यात आली.

उपस्थित सर्व मान्यवर लेखक-विचारवंतांचे स्वागत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. श्रीकांत कात्रे यांनी निवेदन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सिंधुताईंचे कार्य वटवृक्षांसारखे आहे; ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभूणे यांचे प्रतिपादन

रेणुताई गावस्कर व सेवा संकल्प प्रतिष्ठानला 'पद्मश्री डॉ. सौ....

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणार: आबा बागुल यांची ग्वाही

पुणे -तळजाई टेकडी येथील सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम तसेच...