पुणे : थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाच्या जनक आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘पीएमआरडीए’च्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणप्रसारासाठी तसेच स्त्री–पुरुष समानतेसाठी केलेल्या अमूल्य कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरूषोत्तम सांगळे, सेवानिवृत्त सर्व्हेअर जयसिंह गाडे, संतोष तावरे, शशांक वकिल, पांडुरंग मधुरकर, तसेच जमीन व मालमत्ता विभागातील कर्मचारी संतोष म्हेत्रे, अंकिता जाचक, नीता जाधव, श्रद्धा भट, राजकुमार शिरसाठ यांच्यासह ‘पीएमआरडीए’च्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना व कार्याला अभिवादन करत, समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

