पुणे -. विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना पक्षाचे उमेदवार आबा बागुल यांनी दिली.प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांना प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रभागात प्रचारादरम्यान मतदारांनी आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांशी संवाद साधून संपूर्ण पॅनेलच्या विजयाचा निर्धार केला. यावेळी आबा बागुल म्हणाले की,शिक्षण हे सर्वांनाच मिळावे. वंचित घटकातील मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी देशात प्रथमच स्व. राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कुलची उभारणी केली. त्याच धर्तीवर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रत्येक प्रभागात ई- लर्निंग स्कुलची उभारणी करण्यासाठी कार्यरत असणार आहे. राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आबा बागुल म्हणाले.

