नीलम गोऱ्हे यांनी नाव न घेता मारला मुरलीधर मोहोळांना टोला
शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ उद्या
पुणे- एकनाथ शिंदे यांची शिवसेना ११० जागा स्वतंत्रपणे लढवीत असल्याचे सांगून विधानपरिषद उपसभापती आणि महिला चळवळीतील देशपातळीवरील नेत्या , शिवसेनेच्या पुण्याच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव न घेता त्यांना जोरदार टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या पूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते नंतर महायुतीचे सरकार आले पण महापालिकेत त्याकाळात झालेले घोटाळे , पुण्याची झालेली खडतर स्थिती यास कोण कारणीभूत होते आणि आहे हे त्या महापौरांना च माहिती आहे ज्यांनी अन्य पदे हि भोगली , ९२ /९३ नगरसेवकांचे पाठबळ त्यांना मिळाले होते सारे आमदार त्यांचे होते .तरीही या बाबी झाल्याने त्यांना याबाबत माहिती असेलच .
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचा उद्या (३ जानेवारी) आपल्या सर्व उमेदवारांच्या प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ करणार आहे. प्रथम दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची भव्य आरती करून आणि शुभआशीर्वाद घेऊन होणार आहे. त्यानंतर हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड, पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेत्यां डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी तसेच आबा बागुल, नमेश बाबर, सारिका पवार, सुदर्शना त्रिगुणाईत आणि पूजा रावेतकर यांची उपस्थिती राहणार आहे.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “धनुष्यबाण चिन्हाला विजयी करूया, पुणे शिवसेनेचे करूया,” अशा घोषणांनी प्रचार अभियानाला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार अभियानाच्या या शुभारंभाने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

