भाजपाकडे खासदार ,आमदार ,शंभर नगरसेवक असताना शहराला आणि वानवडीला काय मिळाले?

Date:

प्रशांत जगताप यांच्या जोरदार प्रश्नांनी प्रचाराची सुरुवात !

पुणे :

काँग्रेस – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीचे वानवडी -साळुंखे विहार प्रभाग क्रमांक १८ मधील अधिकृत उमेदवार ,माजी महापौर प्रशांत सुदामराव जगताप यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळीच प्रचाराचा प्रारंभ केला.

वानवडी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.घरातील ज्येष्ठांचे ,वानवडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून महाराजांचे आशीर्वाद घेतले.वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  या प्रभागातील उमेदवार सौ.रत्नप्रभा जगताप,  साहिल केदारी,सौ.शमिका जांभुळकर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी,अभय छाजेड,नानासाहेब जगताप ,शिवाजी (अण्णा ) केदारी उपस्थित होते. 

प्रशांत जगताप म्हणाले,’काँग्रेस – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही वानवडी-साळुंखे विहार प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहोत. भारतीय संविधानाला स्मरून, शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराचा अंगीकार करून आम्ही सर्वसमावेशक विकासासाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी सज्ज आहोत. ही निवडणूक म्हणजे केवळ एखाद्या पदासाठी सुरू असलेली धडपड नाही, महात्मा फुलेंनी आपल्याला दिलेल्या समतेच्या विचारांची जपणूक करण्याचा हा लढा आहे. या लढ्यात आम्हाला यश मिळावे अशी यावेळी त्यांनी प्रार्थना केली ! सर्वाना नवीन वर्ष आणि शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. आपल्या माता भगिनींच्या जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारा हा दिवस “फुले दांपत्य सन्मान दिन” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यास देखील प्रशांत जगताप यांनी विनम्र अभिवादन केले.

*वानवडीला काय मिळाले* ?

प्रचार शुभारंभ केल्यावर भाषण करताना प्रशांत जगताप म्हणाले,’भाजपाकडे खासदार ,आमदार ,शंभर नगरसेवक असताना शहराला आणि वानवडीला काय मिळाले,याचा विचार केला पाहिजे. ही निवडणूक भ्र्रष्टाचार आणि दादागिरीच्या विरोधातील आहे.पुणेकरांची नागरी समस्यांतून सोडवणूक करायची आहे.त्यासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे.आम्हाला मिळालेल्या निधीची कामे दाखवून देऊ आणि सत्ताधाऱ्यांना अधिक निधी मिळूनदेखील त्यांनी केलेली विकासकामे भैरोबा नाल्यात वाहून गेली का हे सांगावे !

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...