चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

Date:

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव

पुणे : संधीची वाट न पाहता ती मिळविली, आयुष्यातील विविध टप्पे आव्हाने म्हणून स्वीकारली. कार्यरत क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठण्याकरिता आयुष्यात आदर्श व्यक्तिमत्वांची साथ, संगत मोलाची ठरली. माझ्या आयुष्यात मूल्य जपणाऱ्या, चारित्र्यवान व समाजभान देणाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारला. त्यामुळे आयुष्यातील खडतर प्रवासात यश मिळत गेले, अशा भावना वरिष्ठ कॉर्पोरेट सल्लागार, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांनी व्यक्त केल्या.

समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या जिंदादिल पुरस्काराने सचिन ईटकर यांचा आज (दि. २०) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ईटकर बोलत होते. पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या उर्जा देणाऱ्या वास्तूत ज्यांना मी आदर्श आणि प्रेरणास्थान मानतो अशा व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार मिळणे ही आनंददायी बाब आहे, असे सांगून सचिन ईटकर म्हणाले, माझ्या जडणघडणीत आईचे संस्कार, वडिलांचा कष्टाळू स्वभाव व प्रामाणिकपणा यांचा प्रभाव आहे. मला आयुष्यात भाई वैद्य, द. मा. मिरासदार, नारायण सुर्वे, गं. ना. जोगळेकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. सदानंद मोरे यांसारख्या महान व्यक्तीमत्त्वांचा सहवास लाभल्याने आयुष्याला दिशा मिळत गेली.

चंद्रकांत दळवी म्हणाले, सचिन ईटकर यांच्या यशस्वीतेमागे कुटुंबियांचा पाठींबा आहे. त्यांच्यातील संशोधक वृत्ती जागृत असल्याने त्यांनी ज्या क्षेत्रात कार्य केले तेथे अत्युच्च शिखर गाठले आहे. पुढाकार घेण्याची वृत्ती आणि कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची दुर्मम्य इच्छा असल्याने त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

विद्याधर अनास्कर म्हणाले, सचिन ईटकर यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत आशावादी आहे. त्यामुळे ते अखंडपणे प्रयत्नशील असतात. अशाच व्यक्तीला कायम यश मिळत जाते. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद घेणे, कुठल्याही संकटाला हसत सामोरे जाणे, सर्जनशीलता आणि नाविन्याची शोध घेण्याची वृत्ती असलेल्या जिंदादिल स्वभावाच्या व्यक्तीला मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्यास साजेसाच आहे. रंगत संगत प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. संजय चोरडिया, डॉ. गिरीश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी अवगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार ॲड. प्रमोद आडकर यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....