पुण्यात हिंदू महासभा रिंगणात:महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

Date:

पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारिणीकडून माहिती

पुणे:अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिली आठ जणांची उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभा पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरत असून हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित विकासात्मक राजकारण हा पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.व्यावसायिक,पत्रकार,गृहिणी,सामाजिक कार्यकर्त्यांचा यादीत समावेश आहे. 

पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या उमेदवार यादीत पुढील उमेदवारांचा समावेश आहे. विवेक परदेशी (प्रभाग २३ ड),प्रशांत भालेराव (प्रभाग २४ ड),सूर्यकांत कुंभार  (प्रभाग २५ ब),तृप्ती तारे (प्रभाग २५ क),अजित जोशी (प्रभाग २५ ड),नितीन शुक्ल (प्रभाग ३४ ड),विद्या घटवाई  (प्रभाग ३५ ब), राजेंद्र देशपांडे (प्रभाग ३७) हे उमेदवार निवडणूक लढणार असून पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

‘मतदारांची आम्ही किंमत नाही करणार,आम्ही ना यात्रा काढणार, ना करमणूकीचे कार्यक्रम घेणार’, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास साधणे हा या उमेदवारांचा मुख्य उद्देश असेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला.चांगले, सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय उमेदवार देऊन आम्ही फक्त दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा, सुरक्षित जीवन देण्याचा प्रयत्न करणार,असे आनंद दवे यांनी सांगितले. 

या वेळी हिंदू महासभेचे प्रदेश सहकार्यवाह मनोज तारे, प्रदेश सरचिटणीस नितीन शुक्ल, प्रदेश संघटन प्रमुख उमेश कुलकर्णी, प्रदेश महिला समन्वयक सौ.अदिती जोशी, तसेच महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा भोसले-बुडुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.उर्वरित प्रभागांसाठी उमेदवारांची पुढील यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून निवडणूक प्रचार अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाणार असल्याची माहिती हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदी परशुराम वाडेकर

पुणे :महापालिकेत आज सोमवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर...

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध...