पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून उमेदवारी मिळवण्याकडे लागलेल्या आहेत. दुसरीकडे प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठीवर देखील जोर दिला जात आहे. यामध्ये आजच्या आधुनिक काळातील साधनांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केईएम हॉस्पिटल भागामध्ये सध्या माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
बिडकर यांनी नगरसेवक तसेच सभागृह नेते म्हणून काम करताना प्रभागाच्या विकासासाठी केलेल्या विकासकामांची माहिती देणाऱ्या एलईडी व्हॅनचा शुभारंभ आज करण्यात आला. या प्रचार रथांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाचा अजेंडा देखील मांडला जाणार आहे.
यावेळी गौरीताई बिडकर, प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा अनघा दिवाणजी, कल्पनाताई बहिरट, गणेश यादव, देवेंद्र उर्फ छोटू वडके, उद्धव मराठे, लाला दवे, संदीप कडू, योगीराज मालेगावकर, सागर गायकवाड, निखिल बहिरट, राजेंद्र नरवडे, माऊली शिवले, सुनील पाहूजा यांच्यासह प्रभाग क्रमांक 24 मधील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


