मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आता कोकाटे यांचे खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता हे खाते कोणाकडे दिले जाणार याचा निर्णय हा अजित पवार यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे क्रीडा खाते कोणाकडे दिले जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. ऐन निवडणुकीत कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी
Date:

