पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि संदिप खरे यांच्या सादरीकरणात “आयुष्यावर बोलू काही – अविस्मरणीय कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५, सायंकाळी ६ वाजता, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, एल.एम.डी चौक, बावधन, पुणे येथे होणार आहे.याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा देखील संपन्न होणार आहे, भाजपा नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. अशी माहिती बावधन येथील राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष , माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी दिली.
ते म्हणाले या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ,खासदार मेधाताई कुलकर्णी, प्रदेश भाजपा महामंत्री राजेश पांडे , आमदार भीमराव तापकीर (आमदार),भाजपाशहर अध्यक्ष धीरज घाटे,माजी सभागृहनेते गणेश बिडकर श्रीनाथ भीमाले आदी मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेतजगद्गुरु यांकित डॉ. चेतनानंद महाराज, मनोज वेल्डे, एन.डी. मारणे सर, अॅड. पी. नारायण, राजेंद्र बांदल, महेश नानगुडे, अग्मिता चिंचाळकर, कु स्वेद ज्ञानेछर बारगुजे, सौ. सुचित्रा साठे, अनिल पंचचाय, डॉ. किल्यण कुर्तकोटी, अधिनी नावर यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

