‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता सिद्ध करावी
पुणे – दि 17 डिसेंबर
विकासाच्या नावाने सतत धूळफेक करणाऱ्या राज्यातील महायुती सरकार’ने निवडणूक आयोगावर दबाव आणून, सरकारच्या विकास कामांच्या कोट्यावधींच्या तथाकथित घोषणा करेपर्यंत जाणीवपूर्वक ‘निवडणुक घोषणा’ लांबवली व प्रशासकीय यंत्रणेद्वारे सरकारी खर्चाने कार्यक्रम करवुन घेऊन, राज्यातील ‘मनपा निवडणुक’ जाहीर करण्याचे कारस्थान हे सत्ताधारी महायुतीच्या दबावाखाली निवडणूक आयोग करत असल्याचे पुन्हा सिध्द झाले असल्याचा आरोप काँग्रेस’चे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला असून निवडणुक आचार संहिता, नैतिक मुल्ये व संकेतांची युती सरकार व आयोगा कडून एकत्रितपणे पायमल्ली होत असल्याची घणाघाती टिका केली. त्यामुळे निवडणूक आयोगा’ने खरी धमक दाखवून, सत्ताधाऱ्यांना ‘आचार संहिता भंगाच्या’ कारवाई च्या किमान नोटिसा तरी पाठवून आपली स्वायत्तता सिद्ध करावी.अशी मागणी देखील काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, विकासाचा आभास निर्माण करण्यासाठी, प्रशासकीय कर्तव्यातुन व नागरी कररुपी पैशातुन पुर्ण झालेल्या ड्रेनेज, पाणी, आरोग्य विषयक योजनांचे लोकार्पण नावाखाली उद्घाटन करणे श्रेयजीवी मानसिकतेचे लक्षण आहे व नव्याने होणाऱ्या मनपा प्रशासकीय नित्य कामांच्या घोषणा या निवडणूक घोषणे दरम्यान ठरवून एकाच दिवशी करणे हे प्रशासकीय नित्य (by default) कामाचे श्रेय लाटणे केविलवाणा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
अनैतिक व असंवैधानिक रित्या सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने, राज्यातील मनपा निवडणुका लांबवून मनपाच्या आर्थिक गंगाजळीचा लाभ उठवला मात्र प्रशासकीय काळात देखील, विकासाचा बँकलॉग मात्र भरुन काढ़ू न शकल्याने ऐन निवडणुका जाहीर होण्याच्या वेळेसच, विकासाचा आभास निर्माण करण्या करीता अशा प्रकारे निवडणुक आयोगाची घोषणा करण्याचा दिवस व वेँळेचे टायमिंग साध्य करावे लागते ही आचार संहिता व संवैधानिक मुल्यांना तिलांजली द्यावी लागते ही सत्ताधारी पक्षाची नैतिक घसरण व शोकांतिका असल्याची टिका प्रदेश काँग्रेस चे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप
Date:

